दिनेश कुऱ्हाडे
उपसंपादक
आळंदी : कोलकाताच्या महिला डॉक्टरवरील अत्याचाराचे पडसाद राज्यभरासह उमटत आहेत.दरम्यान या घटनेच्या निषेधार्थ आळंदी-चऱ्होली डॉक्टर असोशिएशनच्या वतीने आज निषेध मोर्चा काढण्यात आला, यावेळी चाकण चौक येथून मुक मोर्चाची सुरवात झाली. या मुक मोर्चात डॉक्टर असोशिएशन, मेडीकल असोशिएशन, परिचारिका बहुसंख्येने उपस्थित होते, तसेच १७ ते १८ ऑगस्ट दोन दिवस काम बंद ठेवण्याचा निर्णयानुसार एकमताने घेण्यात आला आहे.
कोलकता येथील सरकारी रुग्णालयात कार्यरत एका महिला डॉक्टरवर अत्याचार करून हत्या केल्याची घटना घडलीय. या घटनेने संपूर्ण देश हादरला आहे. दरम्यान या घटनेच्या निषेधार्थ आळंदी-चर्होली डॉक्टर असोशिएशनसच्या वतीने येथील डॉक्टरांनी या संपाला समर्थन देत सहभाग नोंदवला आहे. कोलकाता अत्याचार व हत्या प्रकरणाचा केंद्रीय यंत्रणेकडून निष्पक्ष आणि पारदर्शक तपास करावा, आरोपींना अटक करून कठोर शिक्षा द्यावी, अशी मागणी करण्यात आली आहे. यावेळी डॉ.विकास पाटील,डॉ.उत्तम माटे,डॉ.सुनिल वाघमारे,डॉ.जोत्स्ना आवारी,माजी उपनगराध्यक्ष सचिन गिलबिले,डॉ.ज्योती माटे,डॉ.अंबादास दानवे,डॉ.निलेश रंधवे,डॉ.पोर्णिमा बोरा, यांच्या सह डॉक्टर असोसिएशनचे सर्व सन्मानीय उपस्थित होते.
दरम्यान, डॉ.विकास पाटील म्हणाले, मोठ्या प्रमाणात महिला वैद्यकीय क्षेत्रात तसेच इतर क्षेत्रात कार्यरत असून कामावर त्यांच्या सुरक्षेचा प्रश्न निर्माण झाला आहे त्यामुळे सरकारने कामाच्या ठिकाणी कडक सुरक्षा पुरविणे गरजेचे आहे. यावेळी आळंदी चर्होली डॉक्टर असोसिएनशनच्या निर्णयांना, त्यांच्या मागण्यांना तसेच मूक मोर्चाला इतर संघटनांनीदेखील पाठिंबा दर्शविला.