पुज्य बाबुजींचा,(आमचे दादा)… — आज २९ वा स्मृती दिन..  — त्यांना विनंम्रपणे कोटी कोटी प्रणाम..

           आमचे बाबूजी पुज्य.भिवाजी येसा रामटेके हे अतिशय विनम्र स्वभावाचे चारित्र्यसंपन्न गृहस्थ होते..

      तद्वतच दूरदृष्टी कोणातील उज्वल विचारवंत.दु:खद् आणि हालाखीच्या परिस्थितीला सामोरे जाताना आत्मविश्वासाचा प्रखर आणि स्वच्छ झरा….

      कठीणातल्या कठीण परिस्थितीत न डगमगता वर्तमान आयुष्य जगायचे कसे व विपरीत परिस्थितीत उज्वल भविष्याचे जतन करायचे कसे हे मी त्यांच्याकडूनच न सांगता शिकलोय…

    आमचे बाबूजी कठोर श्रमिक आणि उत्तम कुटुंब प्रमुख.. शेवटच्या श्वासापर्यंत (लहान-मोठ्यांना) कुणालाही अपशब्दात बोलले नाही किंवा कुणाचिही हश्यामजाक केली नाही..

     अपार कष्ट केल्यानंतर सुध्दा कधीकधी जेवण मिळत नव्हते,”तेव्हा बाबूजींचे व आईंचे मन,मी टिपायचा आणि त्यांचे परिस्थितीजन्य दुखद् चेहरे मनात कोरायचा..

      अतिशय प्रभावी व परिणामकारक चारित्र्य असलेले आमचे बाबूजी दिनांक १७ /०८ / १९९५ ला,”पहिल्याच हृदयविकाराच्या तीव्र झटक्याने,”माझ्या हातावर,नेरी येथील डॉ.निमजे यांच्या दवाखान्यात सकाळी ४ वाजून ५३ मिनीटांनी मरण पावले…आणि मी अक्षरशः शुन्य झालोय… निःशब्द झालोय..

       अचानक बाबूजी मरण पावल्याने,”अश्रू थांबून थांबत नव्हते.सोबत मोठ्या बाबांचे चिरंजीव वामन दादा होते.त्यांचेही डोळे सातत्याने ओलेचिंब होते.

        चारही बाजूंनी(सभोवताल) नद्या व मुसळधार पाऊस,चिखलग्रस्त रस्ते.. नद्यांना ओसंडून वाहणारा पूर आणि मरणाच्या बातम्या..स्थिती अधिकच चिंताजनक व गंभीर…

      तरीही पण,नद्यांना पूर असतांना दुसऱ्या दिवशी मरणाला येणाऱ्या मित्रपरिवारांची,नातेवाईकांची संख्या बघून मी अचंबित झालोय.. 

       माझ्या वडिलांच्या अंत्यसंस्कारासाठी मोठ्या संख्येने आलेले आप्त-नातेवाईक ओक्साबोक्शी रडत होते..तेव्हा मी अक्षरशः शांत झालो होतोय..

        आम्ही ३ भाऊ,१ बहिण,सर्व सभ्य…मोठा भाऊ सुपर क्लासवन अधिकारी,लहान भाऊ सुपरवाॅयझर,बहिण वेल एज्युकेटेड(गृहिणी)आणि जावई मॅनेजर…

     आमचे बाबूजी समजदार,शांत व स्वयंमी स्वभावाचे!..बाबूजींवर लिहिले तर हजारो पन्ने रेखाटले जातील…

         “आमची आई सुद्धा समजदार,शांत व स्वयंमी,!..

          आज बाबूजींच्या २९ व्या स्मृती दिनानिमित्त,”मन भरभरून हेलावलेलेच!..

*****

                शब्दांकन 

                  प्रदीप रामटेके

         मुख्य संपादक – दखल न्यूज भारत…