रोहन आदेवार
जिल्हा प्रतिनिधी वर्धा/यवतमाळ
वर्धा :- वृक्ष सेवा समिती तर्फे वाढदिवसाच्या निमित्त वृक्षारोपण कार्यक्रमाला 1 जुलै पासून सिंधी मेघे स्मशानभूमी लगत टेकडीवर आयोजन करण्यात आले आहे.वृक्ष सेवा समिती तर्फे प्रत्येक रविवारी सकाळी 7.30 ते 9.30 यावेळेत श्रमदान शिबिराचे आयोजन करण्यात येत असून 315 वे साप्ताहिक श्रमदान शिबिराचे अखंड आयोजन मागील 6 वर्षा पासून सुरु आहे.
वृक्ष संगोपणाच्या कार्यात प्रत्येक कुटुंबाला आपला खारीचा वाटा देता यावा म्हणून पेपर रद्दी संकलन या उपक्रमातून लोकांच्या कडून पेपर रद्दी दान स्वरूपात स्वीकारून त्याच्या विक्रीतून व लोक सहभागातून वृक्ष संकलनाचे कार्य केले जाते.
समिती च्या वतीने वाढदिवसाच्या निमित्त हरिशभाऊ टावरी, कु आरोही मेंढे, विश्वास जोशी सौ रिता गुजरकर यांच्या वाढदिवसाच्या निमित्त वड, पिंपळ, कडुनिंब, अश्या 100 रोपांचे वृक्षारोपण करण्यात आले.
या कार्याला सौ हर्षदा टावरी यांचे विशेष सहयोग लाभला यावेळी वृक्षारोपण व संगोपन हेच खरे ध्येय जीवन या वृक्ष सेवेच्या कार्यात समितीचे सदस्य तत्पर असल्याचे समितीचे अध्यक्ष निखिल सातपुते यांनी संबोधले तसेच मा श्री हरिशभाऊ टावरी यांनी विदर्भाचा वाळवंट झाला तर पुढच्या येणाऱ्या पिढी आपल्याला माफ करणार नाही. त्यामुळे श्रमदानं शिबीर व पेपर रद्दी संकलन च्या माध्यमातून लोकांनी वृक्ष सेवा समितीच्या कार्यात सर्व शक्तिणीशी सहभागी होण्याचे आव्हान केले. तसेच वृक्ष सेवेच्या कार्यात नेहमी सोबत राहून पर्यावरणाच्या कार्यात सहभागी होणार असे संबोधले.
यावेळी मंगेश भोंगाडे, सुनिल चंदनखेडे, किशोर बाहे, प्रदीप मेंढे, राहुल गोल्हर, अविनाश बुरडकर, मोहनिष पोतद्दार शक्ती गिरीपूनजे, दर्शन महाकालकर, सचिन धरणेधर, नारायनराव चरडे, दिपक चुटे, अशोक भिवगडे,सचिन खंडारे, एस. आर. भेंडेकर, नरेंद्र मिसाळ, अण्णा पेंटे, दिनेश धुरई,सुनील लंगडे, ददनसिंग ठाकूर, राय पोहणकर, निरज लोहकरे, निलेश ढोले, मनोज ढोले, संजय देहरे, डॉ रवी विश्वकर्मा, श्रीकांत कहाते, राहुल वैद्य इत्यादी नागरिक उपस्थित होते.