दिनेश कुऱ्हाडे
उपसंपादक
आळंदी : अलंकापुरी नगरी ही संतांची भूमी म्हणून संपूर्ण महाराष्ट्रात प्रसिध्द आहे. आता या भूमीला हरितवृक्ष भूमी म्हणून नवीन ओळख निर्माण करण्यासाठी मुख्याधिकारी कैलास केंद्रे यांच्या मार्गदर्शनाखाली यशवंती सामाजिक संस्था व इंद्रायणी सेवा फौंडेशनच्या सहकार्याने सिध्दबेट परिसरात वृक्षारोपण करुन भविष्यात तो जोपासण्याचा निर्णय घेतल्याची माहिती यशवंती सामाजिक संस्थचे अध्यक्ष राजेश दिवटे यांच्या वतीने देण्यात आली.
यशवंती सामाजिक संस्थचे अध्यक्ष राजेश दिवटे यांच्या वाढदिवसानिमित्त १०१ झाडांचे वृक्षारोपण इंद्रायणी सेवा फौंडेशनच्या सहकार्याने सिध्दबेट परिसरात करण्यात आले आहे. यावेळी विठ्ठल शिंदे, विष्णू कुऱ्हाडे, डॉ.सुनील वाघमारे, सुखदेव वहीले, पुरुषोत्तम महाराज हिंगणकर, जनार्दन पितळे, शिरीषकुमार कारेकर, अरुण बडगुजर, राजू महाराज दिवाणे व इतर मान्यवर उपस्थित होते.
यावेळी दिवटे म्हणाले की,तापमान वाढीला रोखण्यासाठी वृक्ष लागवड हा एकमेव पर्याय आहे. त्यामुळे यावर्षी आम्ही मोठ्या प्रमाणात वृक्षारोपणाचा संकल्प यशवंती व इंद्रायणी सेवा फौंडेशनच्या सहकार्याने तसेच विविध संस्थांच्या सहकार्यातून करण्याचे नियोजन करत आहोत.
एक पाऊल सिध्देबेटा या मोहिमेला अनेक सामाजिक संस्था वृक्ष लागवड करत आहे, कमी पाण्यावर येणारी वड, पिंपळ, कडुलिंब, करंज, चिंच व आंबा या प्रकारची रोपे सिध्दबेटात लावली गेली आहेत अशी ही माहिती इंद्रायणी सेवा फौंडेशनचे अध्यक्ष विठ्ठल शिंदे यांनी दिली.