भाग……3
काही दिवसाआधी पुण्यातील अल्पवयीन मुलाने दारू ढोसून आपल्या आलेशान वाहनाने दोघांचा अमानुष बळी घेतला. शासन प्रशासन खळबळून जागे झाले.
चंद्रपूर जिल्हा प्रशासनाने ही बाब गांभीरतेने घेतली. दारूविक्री संबंधाने अनुज्ञप्ती धारकांना कडक निदैश दिल्याचे कागदी आदेश निघालेत. पंधरवाडा संपायला येतो आहे, अनुज्ञप्तीवाले मद्य विक्री ठरवून दिलेल्या वेळेवर करताना तुर्तास दिसत आहेत.
चार दिवस असेच चालू दया असे राज्य उत्पादन शुल्क वाल्यांनी गुडफेथ मध्ये सागितल्याची बतावणी सुरू आहे. भविष्यात पुन्हा सकाळी सात पासून हा धंदा सुरू होणारच नाही याची शास्वती सध्या देता येणार नाही असे बोलले जाते.
या दरम्यान चंद्रपूर येथे जिल्हाधिकारी,पोलीस अधिक्षक,राज्यात उत्पादन शुल्क विभागाचे अधिकारी यांच्या विशेष उपस्थितीत जिल्यातील अनुज्ञप्ती धारकांचा महामेळावा आयोजीत करण्यात आला.
यात मूल येथील अनुज्ञप्तीधारक तथा लिकर असोशिएशनचे जिल्हा अध्यक्ष राजू पाटील मारकवार यांनी अनुज्ञप्तीधारक चिल्लर विक़ेते अवैध दारूविक्रीत गुंतले असल्याचा आरोप करून जिल्हातील अवैध ठोक विक्रीचे पितळ उघडे पाडले होते.
९० टक्के अनुज्ञप्तीधारक ठोक विक्री करून कायदा व सुव्यवस्थेची वाट लावत आहेत.अशावेळी जिल्हाधिकारी व पोलीस अधिक्षक यांनी आवाहन करूनही अवैध धंदेवाल्यांची नावे का लपविली जातात? धंदयात पारदशंकता आणून प्रशासनास मदत करण्याचे काम (निर्भीडपणे) लिकर अशोशिऐशन वाल्यांकडूनही अपेक्षीत ठरते.अनुज्ञप्तीधारकांच्या महा मेळ्याव्यात जिल्हातील जवळपास सारे विक्रेते उपस्थित होते.
अवैध ठोक दारूविक्री बाबत जिल्हाधिकारी व पोलीस अधिक्षकांनी सज्जड दम भरूनही स्थानीक गुन्हे शाखेकडून चोरटया ठोक मालाची जप्ती सुरु आहे.लाखोचा मुददेमाल पकडला जातो.वाहने पकडली जातात पण बेकायदेशीर ठोक विक्री करणाऱ्यांची नावे पुढे येत नाहीत याचे कारण जनतेला कळायला वाव दिसत नसल्याचे चित्र दुदैवी चित्त बघावयास मिळते.
जिल्हाधिकारी व पोलीस अधिक्षक कडक कार्यवाहीचा दम भरतात पण ठोक विक्रीचा कळस गाठणाऱ्यांना पाठीशी घालणारे नटवरलाल कोण? हा सवाल मात्रं कायम आहे.
जिल्हाधिकारी यांनी कडक नियमांचे आदेश काढलेत पण यातील नियमांची ऐशीतैशी करण्यातच धन्यता माणणाऱ्यांमागे प्रशासनातील काही नातवरील आहेत अशी जिल्हावासियांची धारणा झाल्याचे स्पष्ट चित्र बघावयास मिळते आहे.
देशी, विदेशी अनुज्ञप्तीधारक मोठया संख्येने बेकायदेशीर ठोक विक्री करतात व जो पावेतो हे सुरू आहे,ही मानसिकता कायम आहे व या चोरांना पाठीशी घालणारे प्रशासनातील नटवरलाल आहेत तो पावेतो जिल्यधिकाऱ्यांच्या आदेशाची अवहेलना सुरू राहणार यावर जिल्यातील जनता ठाम आहे.