भाग – 2
अनुज्ञप्ती देताना व दारू विक्रीकरीता जिल्हा प्रशासनाकडून मोठी नियमावली दिली जाते. या नियमांची अंमलबजावणी झाली किंवा होत आहे असा इतिहास दिसला नसल्याचे जाणकार बोलतात..
कागदोपत्री नियमांचा लेखाजोखा असतो व यातूनच दारु व्यवसायात सुरू असलेला मोठया गैरप्रकारास् वाट मोकळी करून दिली जात असल्याचे बोलले जाते.
चंद्रपूर जिल्हातील वाईनशाप,बियरशापी, बार,देशी दारु दुकान यांना चिल्लर विक़ी ची कायदयाने परवानगी असते.मात्रं या चिल्लर विक़ेत्यांनी ठोक विक्रीचा गोरखधंदा सुरू केल्याने आता जिल्यातील ९० टक्के गावात दारू विकली जाते व यामुळे गावे बरबाद होऊन कायदा व सुव्यवस्थेला तडा गेल्याची बाब लपून राहिलेली नाही असे जाणकारांचे मत असल्याचे दिसून येते.
पुण्यातील एका अल्पवयीन मुलाने मद्यधुंद होऊन दोघांना चिरडले.सारे प्रशासन व चंद्रपूर जिल्ह्याधिकारी नियमावर आले. मात्रं गत अनेक सालापासून दारूच्या अवैध ठोक विक्रीने गावे बरबाद होत असताना यांना फटाके बांधण्याची तसदी घेतण्याची शाशनाची मानसिकता का नाही? हा सवाल चिंतनीय आहे. परवाना बाबत जिल्हा प्रशासन ॲक्शन मोडवर आले ही तशी चांगली गोष्ट, मात्र यात चिल्लर दारू/बियर विक़ेत्यांना ठोक विक्री करण्यापासून रोकण्याजोगे कुठलेही निर्देश दिले असते तर रोग मुळापासून संपला असता असे बोलले जाते.
जिल्हाधिकांऱ्यांच्या आदेशाला पायदळी तुडविण्याचे जे काम चिल्लर दारूविक्री करणारे करतात यामागे प्रशासनातील भ्रस्टाचार हे प्रमुख कारण आहे का? याचा प्राधान्याने विचार होने गरजेचे असल्याचे सर्वत्र मत आहे. चिल्लर दारूविक्री करणाऱ्यांनी चालविलेली ठोक दारूविक्री ही जिल्हाधिकाऱ्यांच्या आदेशाला गोत्यात टाकणारी ठरल्याचे चित्र संपुर्ण जिल्हयात बघायला मिळू लागले आहे.
जिल्हयातील नव्वद टक्के देशी,विदेशी,वाईन/बियर विक्री अनुज्ञप्तीवाले चिल्लर विक़ी परवाना असताना ठोक विक्री करतात व यामूळे चोरमार्गाने पहाटे ४ वाजेपासूनच मद्य उपलब्ध होत असल्याने जिल्हाधिकाऱ्यांच्या एका चांगल्या आदेशाची अवहेलना सुरू नाही का?
आता कुणाच्या मदतीने वा क्रुपेने चिल्लर मद्यविक्री करणाऱ्यांना ठोक विक्रीची खुजली सुटते हे वेगळे सांगायला नको असे जाणकार बोलतात.
उत्पादन शुल्क विभागाचा लाचखोर अधिक्षक संजय पाटील यानी नासविलेली मद्यविक्री यंत्रणा सरळ करायची मानसिकता संबधीत विभागाची नाही हेच समजायचे का? हा सवाल पुन्हा उपस्थित होत आहे.
दारू विक्री संदर्भात सर्व अटी व शर्तींचे काटेकोरपणे पालन तो पावेतो होणार नाही जो पावेतो अनधिकुत ठोक विक्री करणाऱ्या अनुज्ञप्ती धारकांना सुतळीबाम्ब लावणार नाही हिच खरी कार्यवाही असल्याचे बोलले जाते.
दारूबंदी उठल्यानंतर चिल्लर मद्य विक्री करणाऱ्यांनी कोरोना काळातील आपली गरीबी दूर करण्यासाठी ठोक विक्रीचा खूलेआम धडाका लावला हे सहज लक्षात येते.आज जिल्हातील बहुतांस गावात( जिथे अनुज्ञप्ती नाही) चोवीस तास देशी,विदेशी मिळते. ही येते कुठून? याचे उत्तर चिल्लर विक़ेते सहज देऊ शकतात.
मद्यविक्रीतील बेबंदशाही,विक्रेत्यांचा बेशिस्त व्यवहार ,नियमबाह्य दारूविक्री, संबधित विभाग व पोलीसांची हप्तेखोरी,बघता जिल्हाधिकारी यांनी चिल्लर दारू विक्री परवानाधारकांच्या मुसक्या आवळल्या तर सारा दारूचा धंदा शिस्तीत येऊन दुदैवी घटना वेगाने घटणार आहेत असे जाणकार बोलतात.
विशेष
जिल्ह्यात ७०० बार अँड रेस्टॉरंट,१५ वाईन शॉप,१४० देशीदारू दुकान,१५० बिअर शॉपीं आहेत. यातील ९० टक्के अनुज्ञप्तीधारक ठोकविक़ी करून गावांवर अवदशा पसरवत आहेत असे बोलले जाते.