ब्रेकींग न्यूज.. — सहा वर्षिय हर्षलचा सर्पदंशमुळे मुत्यु…

अबोदनगो सुभाष चव्हाण

  अमरावती जिल्हा प्रतिनिधी

         दखल न्युज भारत 

अमरावती :- आज दिनांक 15-6- 2024 रोजी मेळघाटातील चिखलदरा तालुक्यातील शहापूर या गावात अत्यंत दुखद घटना घडली. चिरंजीव हर्षल मनीष खडके वय 6 वर्षे राहणार सलोना याला सर्पदंश झाल्यामुळे त्याचे निधन झाले. चिरंजीव हर्षल हा आपल्या मामाच्या गावी शहापूर येथे असताना ही दुखत घटना घडली. तरी ,त्याला प्रथमोपचारासाठी चिखलदरा ग्रामीण रुग्णालय येथे लगेच नेण्यात आले.

        चिखलदरा हे शहापूर गावापासून 1 ते 2 किलोमीटर अंतरावर आहे पण दुर्दैव असे की तेथे सर्पदंशावर कोणत्याही प्रकारचे अँटी डोस उपलब्ध नसल्यामुळे चिरंजीव हर्षल ला अचलपूर रुग्णालयात रेफर करण्यात आले पण अर्ध्या रस्त्यावर चिरंजीव हर्षल याने अखेरचा श्वास घेतला. या सर्व घटनेमुळे माझ्या मनात एकच विचार आला अशी घटना मेळघाटात आपल्यावर किंवा मेळघाटातील गवळी समाज, आदिवासी समाज बांधवांवर सुद्धा येऊ शकते. मेळघाटात सात प्रकारचे विषारी साप आढळतात त्यात नाग, घोणस, मण्यार, बांबू पेट वायपर, फुरसे, पोवळा, विनू नाग हे अत्यंत विषारी सर्प आहे.

         दरवर्षी अनेक लोक मेळघाटात सर्पदंशाने दगावतात, पण तरीही कोणत्याही राजकीय पक्षाकडून किंवा स्वास्थ्य विभागाकडून यावर काही उपाययोजना केली जात नाही किमान तालुक्याचे ठिकाणी असलेले चिखलदरा ग्रामीण रुग्णालयात सर्पदंशावर कोणतेही अँटी डोस, औषध उपलब्ध नाही.ही एक दुर्देवाची बाब आहे. आज जर चिखलदरा ग्रामीण रुग्णालयात सर्पदंशा वर अँटी डोस किंवा औषध उपलब्ध असते तर चिरंजीव हर्षल चे प्राण वाचले असते. एक आई-वडील म्हणून अशी गोष्ट पाहणे यापेक्षा दु:खद गोष्ट या जगात कोणतीच असू शकत नाही.

       एवढे मोठे मेळघाट क्षेत्र असून या मेळघाटात विषारी व बिनविषारी सर्पाच्या अनेक प्रजाती आहे पण मेळघाटात एकही रुग्णालयात सर्पदंशावर अँटी डोस व औषध उपलब्ध नाही,यापेक्षा मेळघाटाचे काय दुर्भाग्य असणार?

       मला असे वाटते आता तरी मेळघाटातील प्रशासनाने,आमदार तसेच खासदार व राजकीय पक्ष यांची डोळे उघडले पाहिजे.

       किमान एखादे तरी सुसज्ज रुग्णालय मेळघाटात बनवली पाहिजे की जेणेकरून अशा घटना घडू नये व नुसते राजकारण न करता मेळघाटातील मुख्य समस्यांवर व स्वास्थ प्रणालीवर जाणीवपूर्वक लक्ष द्यावे.

         जर आपण एका 6 वर्षाच्या मुलाचे प्राण वाचवू शकले नाही तर मानवी समाजाला विकसित व एवढा आधुनिक होऊन काहीच फायदा नाही.

पुन्हा एकदा चिरंजीव हर्षल ला भावपूर्ण श्रद्धांजली 💐💐💐💐

 मनाच्या अंतकरणापासून वाटले म्हणून🙏🙏🙏🙏