जातीअंतासाठी महात्मा बस्वेश्वर यांचे विचार आदर्शवत :-समतादुत प्रज्ञा राजूरवाडे 

     रामदास ठूसे 

विशेष विभागीय प्रतिनिधि

       महात्मा बस्वेश्वर हे बाराव्या शतकातिल समाजीक समतेचा पुरस्कार करणारे विचारवंत होते. त्यांनी वैज्ञानिक दृष्टिकोनातुण मानवधर्माची शिकवन दिली. स्त्री पुरुष समानतेचा पुरस्कार केला.  वर्णव्यवस्था जातीव्यवस्थेवर प्रहार केला. आंतरजातिय विवाहाला प्रोत्साहन देवुन भारतातिल जातीअंताच्या चळवळीचा पहिला प्रयोग केला. 

          महात्मा बस्वेस्वर यांचे विचार आजही जातीअंतासाठी आदर्शवत आहे असे प्रतिपादन डॉ. बाबासाहेब आंबेडकर संशोधन व प्रशिक्षण सस्था बार्टि पुणेच्या समतादुत प्रज्ञा राजूरवाडे यांनी नगर परिषद चिमुर येथे महात्मा बस्वेश्वर यांच्या जयंतीनिमित्त आपल्या प्रमुख मर्गदर्शणात बोलत होत्या.

           या कार्यक्रमाचे अध्यक्ष पंचायत अभीयंता निखिल काटेकर हे होते. प्रमुख पाहुने कर अधीक्षक कपील लालेवार वैभव काशमीपटवार लेखापाल वैभव करांडे विद्यूत अभियंता होते. पुढे बोलताना समतादुत प्रज्ञा राजूरवाडे म्हनाल्या कि महात्मा बस्वेश्वर यांनी अनुभव मटपची स्थापना करूण सर्वजातीधर्मातिल लोक ऐकत्र केले लोकशाही संसदची स्थापना करूण स्त्री पुरुष समानतेला महत्व दिले.विचारवंत निर्माण केले, माणसे उभी केली व श्रमप्रतिस्ठाचे महत्व सांगीतले.

           ग्रामीण उद्योगाचे महत्व पटवुन दिले असे महात्मा बस्वेश्वर हे कृतीशील संमताधिस्ठीत समाज निर्माण करन्यावर त्यानी भर दिला. सामाजीक सांस्कृतिक राजकीय आर्थिक बाबीचा समाज आणि लोककल्यानासाठी उपयोग केला, असे सविस्तर मार्गदर्शन समतादुत प्रज्ञा राजूरवाडे यांनी केले.या कार्यक्रमाचे संचालन शूभम डांगे तर आभार विक्की खोब्रागडे यानी मानले.