प्रियकर प्रियशीने एकाच दोरीने घेतला गळफास… — मात्र प्रियशी जिवंत तर प्रियकर मृत…

ऋषी सहारे

   संपादक

   आरमोरी शहरात बुधवार दिनांक – १५ मे रोजी रात्री दहा साडे दहा वाजेच्या सुमारास प्रियकर व प्रेयसी यांनी एकाच वेळेस भाड्याच्या खोलीमध्ये गळफास घेऊन आत्महत्या करण्याच्या नादात प्रियकर याचा मृत्यू झाला तर प्रेयसीचे पाय जमिनीवर लागल्याने प्रेयसी बेशुद्ध होऊन थोडक्यात बचावल्याची घटना काल,गुरुवार दिनांक – १६ मे रोजी घडली.सदर घटना सर्वत्र वाऱ्यासारखी पसरल्याने सायंकाळी सात वाजेच्या सुमारास उघडकीस आली आहे.

        प्राप्त माहितीनुसार, प्रियकर राहुल गजानन

सावसाकडे वय २० वर्षे रा. शिवाजी

चौक,आरमोरी व प्रेयसी हे दोघेही आरमोरी तहसील कार्यालयाच्या मागील बर्डी परिसरातील भाड्याच्या खोलीमध्ये १५ मे रोजी एकत्रित आल्याचे कळते.

       मात्र दोघेही कशासाठी एकत्रित आले हे अजूनपर्यंत कळलेले नाही. त्याच रात्री १० ते ११ वाजेच्या सुमारास आरमोरी शहरातील परिसरात कुणीतरी दोघेजण गळफास घेऊन आत्महत्या केली असल्याची कुणकुण सर्वत्र वाऱ्यासारखी पसरली. 

        मात्र,कुणी गळफास घेतला याची खात्रीशीर माहिती नसल्याने अनेकांनी चुप्पी साधण्याचा प्रयत्न केला.सदर घटनेची माहिती होताच आरमोरी पोलिसांनी घटनास्थळ गाठले.घटनास्थळी दोघेही खोलीमध्ये एकाच दोरीने गळफास घेतला असल्याचे दिसून आले. 

       यात प्रियकर याचा मृत्यू झाला तर प्रेयसीचे जीव घुकघुकिवर होताय.

     अनेक ठिकाणी कुठलीही शहानिशा न करता अनेकांना भाड्याने खोली दिली जात असल्याची खमंग चर्चा आरमोरी शहरात दबक्या आवाजात सुरू आहे. 

       प्रियकर व प्रेयसी यांनी एकाच वेळेस गळफास घेतलाच कसा? असा प्रश्न निर्माण झाला असल्याने शंका-कुशंकेला उधाण आले आहे.गळफास घेण्यामागचे कारण अजूनही गुलदस्त्यात असल्याने याबाबत वरिष्ठ अधिकाऱ्यांनी जातीने लक्ष घालून सदर प्रकरणाचा उलगडा लवकरात लवकर करावा अशी मागणी जोर धरू लागली आहे.