दिनेश कुऱ्हाडे
उपसंपादक
आळंदी : येथील श्रीहरी गोविंद प्रतिष्ठान महायोगधाममध्ये ॲड.रामेश्वर सोमाणी यांच्या भक्तीप्रधान कर्मयोग या ग्रंथाच्या हिंदी आवृत्तीचे नुकतेच प्रकाशन करण्यात आले. यावेळी औरंगाबाद खंडपीठाचे न्यायमुर्ती संजय देशमुख, संपादक सम्राट फडणवीस, मधूसंचय पत्रिकाच्या संपादिका रेखा मंत्री, भारती सहकारी बँकेचे अध्यक्ष बी.बी.कड, श्रीहरी गोविंद प्रतिष्ठानच्या अध्यक्षा अनिता कड, ज्ञानेश्वर शिक्षण संस्थेचे सचिव अजित वडगावकर, किर्ती सोमाणी, श्रीहरी गोविंद प्रतिष्ठान महायोगधामचे पदाधिकारी व साधक वर्ग बहुसंख्येने उपस्थित होते.
ॲड.रामेश्वर सोमाणी यांच्या भक्तीप्रधान कर्मयोग या ग्रंथातून जीवनात चांगले विचार आत्मसात करण्यासाठी भक्तीप्रधान जीवन कसे जगावे याचा अर्थ सांगितला आहे. तसेच श्रीहरी गोविंद प्रतिष्ठान महायोगधाममध्ये सहभागी होऊन मानसिक ताण कमी होतो तसेच आरोग्य उत्तम राहण्यासाठी येथे सर्व प्रकारचे मार्गदर्शन केले जात आहे असे औरंगाबाद खंडपीठाचे न्यायमुर्ती संजय देशमुख यांनी यावेळी सांगितले.
तसेच भक्तीप्रधान कर्मयोग या मराठी ग्रंथाला वाचकांनी उत्तम प्रतिसाद दिला इतर भाषिकांना सुध्दा याचा अभ्यास होवा यासाठी या ग्रंथाचे हिंदी आवृत्तीचे प्रकाशन करण्यात आले आहे तसेच भविष्यात इंग्रजी व इतर भाषेत सुध्दा ग्रंथ प्रकाशित करण्यात येणार असल्याचे ॲड.रामेश्वर सोमाणी यांनी सांगितले.