युवराज डोंगरे/खल्लार
उपसंपादक
नालंदा बुद्ध विहार साईनगर अमरावती परिसरात क्रांतीबा ज्योतिराव फुले जयंती, विद्यार्थी मेळावा, महिला मेळावा आणि डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंती या चार दिवसीय कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते . त्यामधील तीसरे पुष्प म्हणजे महिला मेळावा मोठ्या उत्साहात पार पडला.
कार्यक्रमाचे अध्यक्षस्थानी रमाई महिला मंडळाचे अध्यक्षा सुनिता रामटेके ह्या होत्या, तर प्रमुख अतिथी म्हणून प्रमिला राहुल शेंडे, गटशिक्षणाधिकारी प.स.नांदगाव तसेच सुजाता बनसोड आणि ताराबाई लिंघाटे धम्मपिठावर विराजमान होते. फुले आंबेडकरी चळवळीत महिलांचे योगदान या विषयावर प्रमिला शेंडे यान्नी आपले विचार व्यक्त केले. या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन संगीता सुरज मंडे यांनी केले तर कार्यक्रमाचे प्रास्ताविक कोमल रवीकुमार मेश्राम यांनी तर या कार्यक्रमाचे आभार प्रदर्शन शिला तायडे यांनी पार पाडले.
या कार्यक्रमाचे आयोजन महिलांच्या कलागुणांना वाव मिळण्याकरिता दरवर्षी करण्यात येत असते. त्यामधे महिलांनी आपल्या कला सादर केल्या. यामधे प्रामुख्याने मंदा मेश्राम यांनी वंदन गीत सादर केले तर छाया प्रकाश खंडारे, आणि सोनाली प्रमोद मेश्राम यांनी धम्मपीठावरून आपले विचार व्यक्त केले. इंदिरा विनायक दुधे, शीला तायडे यांनी भीम गित सादर केले.
कार्यक्रमाचे यशस्वीेते करिता रमाई महिला मंडळ अध्यक्ष सचिव व सर्व पदाधिकारी आणि सदस्य, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर बहुउद्देशीय अध्ययन मंच चे अध्यक्ष, सचिव सह सर्व पदाधिकारी आणि सदस्य, नालंदा बुद्ध विहार परिसरातील बहुसंख्य उपासक उपासिका नागरीक, महिला आणि विद्यार्थी उपस्थित होते.