प्रदीप रामटेके
मुख्य संपादक
रोजगार हमी योजना (मनरेगा) अंतर्गत कामाचे रुपये वेळेवर देणे सोडून रेशन दुकानातून निकृष्ट दर्जाच्या साड्या देणे सुरु केले.या साड्या आम्हाला नकोत,आम्हाला आमच्या मजूरीचे रुपये आधी द्या,आम्ही आमच्याच रुपयांनी साड्या घेऊ असे ठणकावत पालघर जिल्हातंर्गत डहाणू आणि जव्हार तालुक्यातील मजूर महीलांनी तहसीलदार यांना साड्या परत केल्यात.
आ.शकुंतला भोईर म्हणतात,”वर्षभरात साड्या देण्यापेक्षा रोजगार हवाय,शिक्षण हवय.आमच्यासाठी साड्या आम्ही घेऊ,त्या निकृष्ट दर्जाच्या साड्या आम्हाला गरजेच्या नाहीत.गावात शाळा आहेत,तिथं मास्तर द्या.
दहावी-बारावी शिकलेली पोरं गावात हायेत,त्यांना नोकऱ्या भेटल्या पाहिजेत.
“रोजगार हमी योजनेचं काम केलंय.दहा-दहा मस्टर भरलेत.चार-पाच महिन्यांपासून त्यांचे पैसे दिले नाहीत.आमच्या मेहनतीचं आम्हाला द्या ना?या साड्या घेऊन काय करू?आम्ही काय भिकारी आहोत काय?”
साड्या वाटणं आणि मोदींचे छायाचित्र छापलेल्या अनाजाच्या बॅग वाटप करणं म्हणजे केवळ भाजपचा प्रचार करणं आहे,लोकांची फसवणूक आहे आणि लोकांवर अन्याय सुद्धा आहे,असा खणखणीत इशारा दोन्ही तालुक्यातील आदिवासी महिलांनी दिला.