संपादकीय
प्रदीप रामटेके
मुख्य संपादक
निद्रिस्त झालेले खासदार व आमदार हे जनसंपर्कातंर्गत लोकहिताचे कार्ये व कामे करु शकत नाही.याचबरोबर ते सर्वसामान्य नागरिकांच्या संपर्कात राहून त्यांच्या समस्यांना समजून घेवू शकत नाही किंवा आपापल्या निर्वाचन क्षेत्रातील नागरिकांना महत्व देऊ शकत नाही याची कल्पना भाजपाच्या केंद्रीय पक्ष श्रेष्ठींना झाली आहे.
यामुळेच त्यांनी आपल्या पक्षातील खासदार व आमदारांना त्यांच्या निर्वाचन क्षेत्रातंर्गत गावात जावे व सदर गावातील नागरिकांसी बैठकी द्वारे संवाद साधावा,त्यांच्या समस्या जाणून घ्याव्यात आणि तिथेच मुक्काम करावा असे आदेश दिलेत.
म्हणूनच पक्षश्रेष्ठींच्या आदेशानुसार भाजपा पक्षातील खासदार व आमदार हे आपापल्या निर्वाचन क्षेत्रातंर्गत गावात जाऊन मुक्काम करु लागले आहेत.
भाजपाच्या केंद्रीय पक्षश्रेष्ठींनी गोपनीय सर्वे अंतर्गत माहिती घेतली असता त्यांच्या पक्षातील बरेच खासदार व आमदार हे जनसंपर्कात राहात नसून ते केवळ कार्यक्रमापूरते मर्यादित झाले असल्याचे वास्तव्य पुढे आणले.
यामुळे लोकसंपर्क नसलेले खासदार व आमदार येणाऱ्या लोकसभा व विधानसभा निवडणुकीत पराभूत होऊ शकतात याचा अंदाज त्यांना आला आणि वेळेचे भान राखत पक्षातील खासदार व आमदारांचा असंवेदनशील गोपनीय अहवाल त्यांच्या हातात दिला.
पक्ष श्रेष्ठींकडून संवेदनशील व असंवेदनशील कार्यातंर्गत गोपनीय अहवालाच्या प्रती खासदार व आमदारांना मिळताच ते खडबडून जागे झाले आणि आपापल्या निर्वाचन क्षेत्रात जावून मुक्काम करु लागले.
गोपनीय सर्वे अंतर्गत माहिती नुसार भाजपच्या खासदारांनी व आमदारांनी आपापल्या निर्वाचन क्षेत्रात जनसंपर्क केला नाही आणि नागरिकांच्या समस्यांना महत्व दिले नाही तर त्यांना येणाऱ्या लोकसभा व विधानसभा निवडणुकीत पक्षाकडून तिकीट दिले जाणार नाही असी ताकीद दिली गेली असल्याची गोपनीय माहिती आहे.
भाजपा प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी महाराष्ट्र राज्यातंर्गत खासदार व आमदारांच्या वेगवेगळ्या बैठका घेत त्यांना पक्षश्रेष्ठींच्या आदेशाची अहवेलना होणार नाही याची दक्षता घेण्याची तंबी त्यांना दिली व गाव मुक्कामातंर्गत नागरिकांच्या भेटीचा आणि गाव मुक्कामातंर्गत नागरिकांच्या समस्यांचा अहवाल सादर करण्याचे निर्देश दिले.
भाजपाच्या केंद्रीय पक्षश्रेष्ठींना त्यांच्या पक्षातील खासदार व आमदारांना त्यांच्या निर्वाचन क्षेत्रातंर्गत गावात जाऊन मुक्काम करण्याचा व मुक्कामातंर्गत तेथील नागरिकांच्या समस्या जाणून घेण्याच्या सुचना द्याव्या लागतात हे पक्षश्रेष्ठींचे संवेदनशील कर्तव्य समजावे की त्यांच्या काही खासदार व आमदारांच्या पराभवाची त्यांना झालेली जाणीव समजावी हे लोकसभा व विधानसभा निवडणुकीतून पुढे येणारच..
प्रश्न हा पडतो की,भाजपा पक्ष श्रेष्ठी नागरिकांच्या मुलभूत समस्यांना व विविध सुविधांना जाणून घेण्यासाठी आपल्या खासदार व आमदारांना,”गाव मुक्कामी पाठवित असताना, खरोखरच त्यांच्या मुलभूत समस्यांना व विविध सुविधांना महत्त्व देणार आहेत काय? आणि मुलभूत समस्यांचे निराकरण करुन,नागरिकांना विविध सुविधा उपलब्ध करून देणार आहेत काय?हा प्रश्न अकालनिय असाच आहे.
कारण भाजपाच्या शेष नेतृत्वाने निवडणूकातंर्गत मतदारांना भर सभेतून भरघोस दिलेल्या आश्वासना प्रमाणे त्यांच्या मुलभूत समस्यांना अजिबात महत्व दिले नसल्याचे सत्तापक्ष भाजपाच्या कार्यपद्धतीवरुन देशातील नागरिकांच्या निदर्शनास आले आहे.
१) शैक्षणिक व्यवस्था महागाडी करणे,२) शिष्यवृत्ती वेळेवर न देणे,३) लघू रोजगार बरबाद करणे, ४) श्रमिक नागरिकांना रोजगार न देणे,५) बेरोजगारांना भुलथापा देणे,६) भरमसाठ माहागाई वाढविणे,७) स्वस्त धान्य दुकानातंर्गत शिधापत्रिका धारकांना अनाज कमी देणे,८) शेतकऱ्यांच्या शेतीमालाला योग्य भाव न देणे,९) नोकर भरती कंत्राटी पद्धतीने करुन असाह्य पध्दतीने जिवन जगण्यास सुशिक्षित बेरोजगारांना भाग पाडणे,१०) सुशिक्षित बेरोजगारांना रोजगार करण्यासाठी बॅंकाद्वारा कर्ज उपलब्ध करून देण्याची हमी न घेणे,११) विना परिक्षा वरिष्ठ पदावर केवळ उच्च वर्णियांना घेणे आणि बहुजन समाजातील सुशिक्षित बेरोजगारांच्या बाबत भेदभाव करणे,१२) ओबीसी समाजातील अडिचशेच्या वर होतकरूना आयएएस अधिकारी होवू न देणे,१३) ओबीसी समाजाची जातीनिहाय जनगणना न करणे व त्यांच्या उन्नतीसंबंधाने आर्थिक नियोजन न करणे,१४) लोकसंख्येच्या प्रमाणात ओबीसी समाजातील खासदार व आमदार होवू न देणे,१५) देशातील ओबीसी नागरिकांना योग्य प्रतिनिधित्व वेळेत मिळू नये म्हणून कायदेशीर प्रक्रिया अंतर्गत त्यांना लोमकळत ठेवणे,१६) देशातील नागरिकांना समतेने वागण्यासाठी व एकमेकांबरोबर बंधुत्वाने राहण्यासाठी सदभावनेची परिस्थिती अनुकूल न करणे,१७) खाजगीकरणा अंतर्गत भांडवलदारांच्या घशात देशाची मालमत्ता टाकणे व यामाध्यमातून आर्थिक आणि सामाजिक विषमतेला चालणा देणे,आणि इतर महत्वाच्या बाबी..
सडका,बिल्डिंगा आणि इतरेत्र बांधकाम करण्यासाठी आवश्यक निधी उपलब्ध करून देणे व भांडवलदारांचे खरबो रुपयांची वारंवार कर्जे माफ करुन त्यांनाच वारंवार कर्ज देणे,व्यवसाय निर्मितीच्या नावावर हजारो एकर जागा भांडवलदारांच्या झोळीत टाकणे,जागतिक बॅकांकडून वारंवार कर्जे घेणे व देशातील नागरिकांवरचे कर्ज सातत्याने वाढवणे, हे कामे भाजपा सत्ता पक्षाला खूप जमते आहे.
मात्र,या देशातील नागरिकांच्या सर्वांगीण उन्नतीसाठी,या देशातील विद्यार्थ्यांना योग्य व उत्तम शिक्षण देण्यासाठी,विद्यार्थ्यांना नोकरीत सामावून घेण्यासाठी रुपयांचे दीर्घकालीन नियोजन भाजपा सत्तापक्षाला करता येत नाही याला काय म्हणायचे?
देशातील नागरिकांना या – ना – त्या विचारांनी सातत्याने भावनिक बनवून त्यांची वारंवार कुचंबणा करणे – त्यांना वारंवार बेदखल करणे,त्यांना स्वावलंबी होऊ न देणे,अशा प्रकारच्या भावनिक विचारांचा भावनिक खेळ कुठ पर्यंत चालणार किंवा चालू राहणार?
या देशातील नागरिकांसाठी कठीण वेळ व कठीण काळ सुरू झाला आहे असे समजायचे काय?हे तरी सत्ताधाऱ्यांनी स्पष्ट केलेले बरे!..
अर्थात खासदार व आमदारांनी आपापल्या निर्वाचन क्षेत्रात गाव मुक्काम करुन तेथील नागरिकांच्या मुलभूत गरजांना महत्त्व दिले नाही तर त्यांच्या गाव मुक्कामातंर्गत कर्तव्याला किती महत्त्व असेल? हे भाजपचे शेष नेतृत्वच सांगू शकेल..