
युवराज डोंगरे/खल्लार
अखिल महाराष्ट्र प्राथमिक शिक्षक संघ जिल्हा अमरावतीच्या वतीने अमरावती लोकसभा मतदार संघांचे लोकप्रिय खासदार बळवंत वानखडे यांना 20 मार्च पासून सकाळ ची शाळा ही 9.00 ऐवजी सकाळी 6.55 ते 11.30 पर्यंत किंवा 7.20ते 11.50 पर्यंत भरविण्यात यावी परंतु कोणत्याही परिस्थिती मध्ये 12 च्या पुढे लहान मुलाचा विचार करिता शाळा नसावी.
तसेही विदर्भात उन्हाचा पारा वाढत असल्यामुळे विद्यार्थी टिन पत्र्याच्या वर्गात तापमान जास्त असल्यामुळे बसू शकत नाहीत. अशी परिस्थिती आपल्याला खेडे विभागात दिसते तरी सकाळ चे वेळापत्रकात बदल करून सकाळी 9 ऐवजी सकाळी 6.55 पासून किंवा 7.20 पासून करावे अशा आशयाचे निवेदन अखिल महाराष्ट्र प्राथमिक शिक्षक संघ जिल्हा अमरावती च्या वतीने देण्यात आले.
निवेदन देते वेळी अखिल महाराष्ट्र प्राथमिक शिक्षक संघांचे जिल्हा कार्याध्यक्ष संजयभाऊ साखरे, शिक्षक बँक चे संचालक संजय नागे, दर्यापूर तालुका सरचिटणीस डी. आर. जामनिक, उपाध्यक्ष प्रमोद कुरळकर, अखिल महाराष्ट्र प्राथमिक शिक्षक संघ,तसेच कास्ट्राईब शिक्षक संघटना चे बाबुराव कुऱ्हाडे हॆ उपस्थितीत होते.