
शुभम गजभिये
विशेष प्रतिनिधी
वणी :- बळीराजा मोठ्या प्रमाणात कर्जाच्या डोंगराखाली दबलेला आहे,खरीप हंगाम २०२५ काहि महिन्यानंतर शेतकऱ्यांच्या तोंडावर आहे व त्यांच्या समोर मोठी समस्या म्हणजे शेती करीता झालेला ख़र्च व उत्पन्न ह्यांचा हिसोब केला तर खर्चापेक्षा उत्पन्न कमी असे चित्र संपूर्ण महाराष्ट्र दिसत आहे.
त्यामुळे पुढील हंगामातील शेती कशी करायची व शेतीला ख़र्च कसा लावायचा या चिंतेत सध्या शेतकरी आहे.
वणी,मारेगांव व झरी परीसरात दौरे करून माहिती गोळा केल्यानंतर असे दिसून आले की,संपूर्ण परीसरातील शेतकरी आर्थिक कोंडित सापडला आहे.
त्याचे मुख्य कारण म्हणजे, उत्पादन खर्चात झालेली वाढ बी-बियाणे व खतांच्या किंमतीत झालेली वाढ व शेतमाला मिळणारा कमी भाव शेतीकरीता मजुरांची कमतरता परीणामी मजुरीचे दरात वाढ ह्या कारणांमुळे शेतकऱ्यांकडे घेतलेले कर्ज भरण्याची ऐपत राहिली नाही.
त्यामुळे बरेच शेतकरी पुढील शेती कशी करायची,बँकेचे कर्ज कसे फेडायचे,मुलीचे लग्न,बारा महिण्याचा शेतीचा व प्रपंच्याचा खर्च कसा चालवायचा ह्या चिंतेने शेतकरी आत्महत्या सुध्दा करीत आहेत.
महायुति सरकारने आपल्या निवडणूकीतील जाहिरनाम्यात शेतकऱ्यांना सरसकट कर्जमाफी ची घोषणा केल्यानंतर त्या आशेवर शेतकरी जिवंत आहे.
महायुति सरकारने निवडणूक जाहिरनाम्यात सत्ता स्थापन होताच शेतकऱ्यांसाठी,”सरसकट कर्जमाफी ” करू असे जाहिर केले आहे.त्यामुळे शेतकरी मोठ्या आशेने ह्या योजने कडे बघत आहे.
त्यामुळे शेतकऱ्यांच्या भल्यासाठी सरकारने तात्काळ “सरसकट कर्जमाफी” जाहिर करावी व शेतकऱ्यांना दिलासा द्यावा असे निवेदनात म्हटले आहे.
सरसकट कर्जमाफी योजना त्वरित जाहिर न केल्यास कांग्रेस पक्षाच्या वतीने शेतकऱ्यांच्या मागणीला वाचा फोडण्यासाठी येत्या 15 दिवसात रस्त्यावर उतरून मोर्चा व धरणे आंदोलन करण्यात येईल.
हे आंदोलन वणी मारेगांव व झरी या विवीध ठिकाणी करण्यात येईल.त्यामुळे उद्भवणाऱ्या कायदा व सुव्यवस्थेच्या प्रश्नास सर्वस्वी सरकार जबाबदार राहिल असा इशारा कांग्रेस पक्षाच्या वतीने देण्यात आला.