केवाडा येथे अवैध दारू विक्रेत्यांवर कारवाई करण्यात यावी – सामाजीक कार्यकर्त्यांची मागणी.‌‌ 

शुभम गजभिये 

 विशेष प्रतिनिधी 

      चिमुर तालुक्यातंर्गत नेरी येथुन जवळच असलेल्या मौजा केवाडा येथील अवैध दारू विक्रेत्यांवर कारवाई करण्यात यावी अशी सामाजिक कार्यकर्त्यांची मागणी आहे.

            केवाडा,गोंदेडा या गावात राहणारे नागरिक राष्ट्रसंत तुकडोजी महाराजांच्या विचारांसी निगडित असुन या गावात अवैध दारू विक्री कोणाच्या आशिर्वादाने चालते हे कळायला मार्ग नाही असे गावातील नागरिकांची सनद बोलते आहे.

      या भुमी मध्ये कोणाच्या आशिर्वादाने अवैध दारूचे अड्डे सुरू करण्यात आले याचा शोध घेतला जावा आणि अवैध दारू चे अड्डे उद्ध्वस्त करण्यात यावे असे गावातील सुज्ञ नागरिकात बोलले जात आहे. 

       गावातील दारू विक्रेते कोणालाही जुमानत नाही.कारण पोलिस प्रशासनाचा वरदहस्त लाभलेला असल्याने ते घाबरत नाही असे गावातील सुज्ञ नागरिकात चर्चा केली जात आहे.

     त्यामुळे राष्ट्रसंत तुकडोजी महाराजांच्या पावन भुमीतील शांतता व सुव्यवस्था धोक्यात आली आहे. 

     तेव्हा जिल्हा पोलिस अधीक्षकांनी तात्काळ लक्ष केंद्रित करून या अवैध दारू विक्रेत्यांवर कारवाई करुन यांच्या मुसक्या आवारण्यात याव्या अशी सामाजिक कार्यकर्त्यांची व सुज्ञ नागरिकांची मागणी आहे.