प्रमोद राऊत
तालुका प्रतिनिधी
चंद्रपूर जिल्हा काँग्रेस कमिटी ओबीसी विभागाच्या वतीने महाराष्ट्र प्रदेशाध्यक्ष भानुदाजी माळी यांच्या सूचनेनुसार ओ.बी.सी.च्या विविध मागण्या संदर्भात जिल्हाधिकारी, चंद्रपूर यांना निवेदन देण्यात आले.
यावेळी निवेदन देताना चंद्रपूर जिल्हा काँग्रेस कमिटी जिल्हाध्यक्ष प्रकाश देवतळे, प्रदेश उपाध्यक्ष उमाकांत धांडे, प्रदेश सचिव नंदकिशोर वाढई प्रदेश सरचिटणीस प्राचार्य नरेंद्र बोबडे, प्रदेश सचिव गुरुदास चौधरी, ग्रामीण जिल्हाध्यक्ष दिवाकर निकुरे, राहुल चौधरी, राहुल ताजने, अजिंक्य मारकवार यांचेसह काँग्रेसचे पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.