दिनेश कुऱ्हाडे
प्रतिनिधी
आळंदी : राजगुरुनगर येथील हुतात्मा शिवराम हरी राजगुरू जन्मस्थळ परिसर विकास आराखडा समिती सदस्यांची नुकतीच नावे जाहीर करण्यात आली असून यात खेड तालुक्यातील भाजप नेत्यांचा समावेश करण्यात आला असून यात प्रामुख्याने माजी जिल्हा परिषद सदस्य अतुल देशमुख, गटनेते शरद बुट्टे पाटील, भाजप तालुका अध्यक्ष शांताराम भोसले, भाजप आध्यात्मिक आघाडीचे नेते संजय घुंडरे पाटील, सत्यशील शेरकर, सुशील मांजरे, आनंद गावडे, विठ्ठल पाचर्णे अशा आठ सदस्यांची नावे महाराष्ट्र शासनाच्या पर्यटन आणि सांस्कृतिक कार्य विभागाच्या वतीने नुकतीच जाहीर करण्यात आले आहेत.
हुतात्मा शिवराम हरी राजगुरू जन्मस्थळ परिसर विकास आराखड्याच्या संदर्भात अहवाल सादर करण्यासाठी विभागीय आयुक्त पुणे यांच्या अध्यक्षतेखाली शासनाच्या आदेशानुसार समिती गठीत करण्यात आली आहे. या समितीत शासन निर्णयन्वये शिरूर लोकसभा मतदारसंघाचे राष्ट्रवादी काँग्रेसचे खासदार डॉ.अमोल कोल्हे यांची सुध्दा सदस्य म्हणून समावेश करण्यात आला आहे. तसेच समितीचे अध्यक्ष पुणे विभागीय आयुक्त असणार आहेत. सदस्य म्हणून खासदार श्रीरंग बारणे, माजी खासदार शिवाजीराव आढळराव पाटील, आमदार भिमराव तापकीर, अतुल भातखळकर, दिलीप मोहिते-पाटील, माधुरी मिसाळ, सुनिल कांबळे, माजी राज्यमंत्री विजय शिवतारे, माजी आमदार शरद सोनवणे,महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळ माजी सदस्य नितीन गुलाबराव गोरे, रमेश कोंडे,उल्हास तुपे,राजेश पांडे,धीरज घाटे,डॉ.राम आपटे,जिल्हाधिकारी,पुणे मुख्य अभियंता,सार्वजनिक बांधकाम प्रादेशिक विभाग,पुणे,अधीक्षक अभियंता, सार्वजनिक बांधकाम मंडळ, पुणे संचालक, सांस्कृतिक कार्य संचालनालय संचालक, सदस्य सचिव पुरातत्व व वस्तूसंग्रहालये संचालनालय.