नाभिक एकता मंच पारशिवनी शहरची कार्यकारणी जाहीर… — अध्यक्षपदी दीपक वालुकर तर,सचिवपदी हिमांशु चौधरी यांची नियुक्ती…

    कमलसिंह यादव 

तालुका प्रतिनिधि पारशिवनी

पारशिवनी::- पारशिवनी नाभिक एकता दुकानदार संघाची कार्यकारणीचा कार्यकाळ संपुष्टात आला असून नवीन कार्यकारणी पारशिवनी शहरातील बाजार चौक शिव मंदिर येथे घोषित करण्यात आली.

          दीपक वालुकर अध्यक्षपदी तर  हिमांशू चौधरी यांची सचिव पदावर सर्वोसम्मतीने नियुक्ती करण्यात आली.उपाध्यक्ष रत्नाकर फुलबांधे,कोषाध्यक्ष आदित्य चिंचोलकर,सहसचिव जितू कळसकर,सहकोषाध्यक्ष अतुल राजूरकर, सदस्य म्हणून दुर्वेश कडू ,ऋषभ साखरकर ,राहुल कावळे, मनीष वलुकर पुष्पगुच्छ देऊन नियुक्ती करण्यात आली .

         या वेळी संजय फुलबांधे, सुरेश साखरकर,प्रामुख्याने उपस्थीत होते.कार्यक्रमात प्रधानमत्री विश्वकर्मा योजनेचा लाभ जास्तीत जास्त नाभिक समाजाने घ्यावा,असे आव्हान हरीश बांगलकर,जीतू गोनाडे यांनी केली. 

           या प्रसंगी प्रमुख्याने सुरेश साखरकर, लीलाधर कावळे रामदास वलुकर, सुधाकर कावळे, संजय चौधरी, महेंद्र कळसकर, सुशील कुरळकर, सचिन थूल , विकास ऊनपाने, नरेंद्र उनपाने आदी नाभिक एकता मंचाचे पदाधिकारी उपस्थित होते.

कार्यक्रमाचे संचालन शेषराव येउतकर केलं आभार देविदास चौधरी यांनी मानले.