वयाच्या 63व्या वाढदिवसानिमित्त गरजू महिलांना साडी वाटप…

   चेतक हत्तीमारे 

जिल्हा प्रतिनिधि भंडारा 

साकोली:- नजीकच्या वीर्शी येथील डॉक्टर निमराजजी कापगते यांनी वयाच्या 63व्या वाढदिवसानिमित्त गरजू महिलांना साडी वाटप करून वाढदिवस साजरा केला.

           सविस्तर, जनसेवा हीच खरी ईश्वर सेवा मानणारे डॉक्टर आपल्याला पाहायला मिळाले असतील.असाच एक उपक्रम तालुक्यातील विर्शी या गावात पाहायला मिळाला.

         वयाच्या 63 व्या वाढदिसनिमित्त गावातील गरजू महिलांना भावाच्या नात्याने साडीचे वाटप करण्यात आले.या वेळी गावातील पदाधिकारी व ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.