डॉ.जगदीश वेन्नम
संपादक
गडचिरोली – भारतीय हवामान विभाग, प्रादेशिक हवामान केंद्र, नागपूर यांच्या जिल्हास्तरीय अंदाजानुसार आज पासून रविवारी पर्यंत दरम्यान गडचिरोली जिल्हयामध्ये वादळी वारा अवकाळी पाऊस गारपीट तसेच विजा पडण्याची अधिक शक्यता वर्तविण्यात आली आहे.तरी गडचिरोली जिल्ह्यातील सर्व नागरीकांनी सदर कालावधीमध्ये सुरक्षित राहुन याबाबत उचित खबरदारी बाळगावी असे आवाहन लोकप्रिय माजी जिल्हा परिषद अध्यक्ष गडचिरोली तथा कृषी उत्पन्न बाजार समिती संचालक अहेरी मा.श्री.( Ajjubhau )अजयभाऊ कंकडालवार यांचेकडून करण्यात आले आहे..!!
गडचिरोली जिल्ह्यात सद्या अवकाळी पाऊस पडत असल्याने शेतकऱ्यांचे पिकांचे नुकसान होत आहे करिता संबंधित प्रशासनाने पंचनामे करून नुकसान भरपाई देण्यात यावी असे मागणी माजी जिल्हा परिषद अध्यक्ष अजय कंकडालवार यांच्या कडून केली जात आहे.जिल्ह्यातील काही ठिकाणी अवकाळी पाऊस पडत आहे आणि प्रशासनाने घराबाहेर पडू नये असे कळविले करीता प्रशासनाने केलेल्या आव्हानला नागरिकांनी सहकार्य करुन घराबाहेर पडू नये. माजी जिल्हा परिषद अध्यक्ष अजय कंकडालवार यांनी विनंती करीत आहेत..!!