
शुभम गजभिये
विशेष प्रतिनिधी
पावसामुळे चिखलगाव ते गिरगांव या मार्गावरील रस्ता खडे पडुन दळणवळण करण्यास अयोग्य झाला आहे.सदर रस्त्याची दयनीय अवस्था झाली असताना सार्वजनिक बांधकाम विभागाचे दुर्लक्ष आहे,यामुळे नागभिड तालुक्यातील गिरगाव ते चिखलगाव मार्गाचे नूतनीकरण करावे यासाठी महेश गिरडकर यांच्या सह इतर सामाजिक कार्यकर्त्यांनी आमदार किर्तीकुमार भांगडीया यांना निवेदन दिले.
या मार्गाने आवागमन
करताना नाहक त्रास सहन करावा लागतो आहे.शाळकरी मुलांना
शाळेत जात असताना खडा चुकुन प्रवास करावा लागतो आहे.रस्ता उकडुन पुर्णपणे रस्त्यावर गिटी
पसरली आहे.रस्त्याच्या मध्य भागात खडे पडल्याने गिट्टीचा जागोजागी पसरलेला आहे.
सार्वजनिक बांधकाम विभागाचे अभियंता लक्ष देत नसल्यामुळे चिखलगांव ते गिरगांव या मार्गाच्या रस्त्याच्या नुतनीकरणाचे काम डांबरीकरणासह त्वरित सुरु करावे यासाठी आमदार किर्तीकुमार उर्फ बंटी भांगडीया यांना निवेदन देण्यात आले.
निवेदन सादर करताना सामाजिक कार्यकर्ता महेश तात्याजी गिरडकर,आकाश बिबिसन बन्सोड अध्यक्ष बांधकाम कामगार यावेळी उपस्थित होते.