भारतीय नागरिकांनो, विनम्र आवाहन….    — एक खोटी गोष्ट दहा वेळेस व्यक्त केली की ती सत्य वाटायला लागते,असे एक मानवी स्वभावाचे हे वैशिष्ट्य आहे……!

भारतीय नागरिकांनो, विनम्र आवाहन….

   — एक खोटी गोष्ट दहा वेळेस व्यक्त केली की ती सत्य वाटायला लागते,असे एक मानवी स्वभावाचे हे वैशिष्ट्य आहे……!

    परंतू , अंतिम सत्य हे केवळ सत्य आणि सत्यच असते…

    परंतू , कांही काळापुरते का होईना त्या सत्याच्या आभासात मानव निमूटपणे, मान्य करत मार्गक्रमण करत असतो. परंतू , जेंव्हा वाघाची खाल पांघरलेल्या गाढवाचे वास्तव बाहेर येते. तेंव्हा मात्र आपणच स्वतःला आश्चर्यचकित होत नाही, परंतू , एक मोकळा दीर्घ श्वास घेऊन पुढील मार्गक्रमण करत असतो.

         असाच कांहीसा “आभास” आपल्या संपूर्ण महाराष्ट्रातील आणि देशातील व्यवस्थेचा झालेला आहे. मग ते मोदी, शहा, मोहन भागवत, अर्थात केंद्रसरकार तसेच फसणवीस, शिंदे, अजित पवार, त्यांचे मंत्रिमंडळ जे सर्वजण सत्तेच्या खुर्चीसाठी लाचार होऊन, येनकेन प्रकारे महाराष्ट्रीयन आणि भारतीय जनतेला तोंड दाबून बुक्क्याचा मार देत आहेत……….

      जसे एखाद्याच्या कानाखाली जाळ काढल्यानंतर क्षणभर चक्कर आल्यासारखे होते…….

   अगदी तसेच……

परंतु क्षणभर म्हणजे इथे क्षण पाच वर्षाचा आहे…..!

     परंतू , या क्षणाच्या ( पाच वर्षांच्या ) बाहेर आल्यावर तरी आम्ही भारतीय व महाराष्ट्रीयन जनता पूर्वपदावर येऊ का…….?

    का पुन्हा दुसरा गाल पुढे करणार आहोत……..?

  हा यक्ष प्रश्न आजही आमच्यासमोर जसाच्या तसा उभा आहे…….!

                 कारण……

        गुलामीची नशा काही औरच असते. जी स्वताचा स्वाभिमान म्हणून मिरवते. कोरड्या अहंकारातून जन्मलेल्या या सर्वप्रकारच्या गुलामीच्या नशेला कायमचे काढून जगाच्या वेशिवर टांगण्याचे आव्हानच तर डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी केलें आहे……..!

        “गुलामांना गुलामीची जाणीव करुन द्या म्हणजे तो बंड करुन उठल्याशिवाय राहणार नाही.”

       परंतू , हा डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचा आत्मविश्वास भारतीय जनता ( इतर देशात ती यशस्वी झाली आणि होईल ) फोल ठरवते का काय अशी शंका यायला लागली आहे……..!

         कारण बुद्धीजीवी वर्ग फुटकळ स्वार्थासाठी एवढा लाचार झालेला आहे की, त्याला त्याचे नैतिक कर्तव्य कशासोबत खावावे हा प्रश्न तो करतो……….!

      याचा अर्थ काय…..?

        अर्थ स्पष्ट आहे, की……

“पढे लिखे लोगोने मुझे धोखा दिया है….!”

        म्हणूनच, आता कुणावरही विसंबून न राहता, मी (प्रत्येक भारतीय नागरिक ) माझ्या राज्यासाठी, देशासाठी संविधान जागृतीतून घटनात्मक, नैतिक हक्क आणि कर्तव्यातून सिद्ध होईन…………

     आणि येथील असंविधानिक मार्गाने स्थापन झालेल्या व्यवस्थेला उखडून टाकून पुन्हा त्यांना पूर्वपदावर आणण्यासाठी “विद्रोह ” करिन……..!

     तेंव्हाच सर्व महापुरुषांना माझे अभिवादन असेल……

            आवाहनकर्ता 

            अनंत केरबाजी भवरे

संविधान विश्लेषक, रेणापूरकर, औरंगाबाद, 7875452689