ऋषी सहारे
संपादक
कुरखेडा : अन्न व औषध प्रशासन मंत्री नामदार धर्मरावबाबा आत्राम यांच्या नेतृत्वावर विश्वास ठेवून बेलगांव (खैरी) येथील विविध पक्षातील कार्यकर्ते पदाधिकारी यांनी राष्ट्रवादी काँग्रसे पार्टी पक्षात प्रवेश केला.
राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात प्रवेश करणा-या मध्ये बेलगांव येशील सुनिल सहारे, दिलीप दरौ, विश्वेश्वर खुने, पुरुषोत्तम ठाकरे, राजेंद्र कोरेटी, सिध्दार्थ सहारे, संतोष लाडे, दिलीप किरंगे, जयपाल सहारे, हरिराम खरकाटे, बुध्दरत्न सहारे यांचा समावेश आहे.
जिल्हाअध्यक्ष रविंद्र वासेकर व जिल्हा नियोजन समिती सदस्य नानाभाऊ नाकाडे यांच्या सूचनेनुसार आरमोरी विधानसभा क्षेत्रात मोठ्या प्रमाणात पक्षाचा विस्तार करण्यात येत आहे. पक्ष प्रवेशावेळी कुरखेडा तालुका अध्यक्ष राम लांजेवार ,जिल्हा उपाध्यक्ष अयुब खान, जिल्हा संघटन सचिव प्रल्हाद वघारे, तालुका संघटन सचिव हरिभाऊ शेंद्रे, यूवक उपाध्यक्ष हेमकृष्ण नाकाडे उपस्थित होते. जिल्हा उपाध्यक्ष बौद्धकुमार लोणारे, विधानसभा प्रमुख किशोर तलमले. जिल्हा सचिव दादाजी प्रधान ,राजेंद्र रामटेके, मुन्ना शेख ,देवराव सुकारे ,प्रभाकर जुमनाके ,जेष्ठ नेते टेटू पा. नाकाडे यांनी राष्ट्रवादी कांग्रेस पक्षात प्रवेश करणाऱ्या कार्यकर्यांचे अभिनंदन केले.