रामदास ठुसे
विशेष विभागीय प्रतिनिधी
उंदड मानवता सर्जनशिल युगनिर्मिती म्हणजे रमाई.डाॅ. बाबासाहेब आंबेडकर यांना ध्येय गाठन्यासाठी दिपस्तंभा सारख्या प्रतिकुलकाळातही मोलाची साथ दिली.नऊ कोटी कुळे उधारन्यासाठी पोटची चार मुले औषधावीना तडफडून दगावली,यासारखे दु:ख जगात कुठल्या तरी स्त्रीच्या वाटेला आले आहे का?
तरी आयुष्यातिल दु:खाचा सत्कार रमाई करतात,म्हणून जगातिल सर्व महिलासाठी माणसिक बळाची शक्ती रमाई होय,असे प्रतीपादन डॉ.बाबासाहेब आंबेडकर संशोधन सस्था बाट्री पूणे च्या समतादूत प्रज्ञा राजूरवाडे यांनी केले.
सावरी (बिड.)येथे रमाई महिला मंडळच्या वतिने सवित्रीबाई फुले- राजमाता जिजाऊ,रमाई जयंतीच्या कार्यक्रमाचे आयोजन केले होते.या कार्यक्रमा प्रसंगी मार्गदर्शन करताना समतादूत प्रज्ञा राजुरवाडे यांनी रमाई,राजमाता जिजाऊ,क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांच्या बाबत उपस्थितांना सखोल माहिती दिली.
या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी जयाताई मेश्राम ह्या होत्या तर उद्घाटक म्हणून ई.जेड खोब्रागडे माजी IAS अधिकारी,रेखाताई खोब्रागडे सविधान फाउडेशंन नागपुर हे होते.
प्रमुख मार्गदर्शक समतादूत प्रज्ञा राजुरवाडे,अधीवक्ता मनिषा पाथाडे,अधीवक्ता राजरत्न पाथाडे,ताराबाई निखाडे हे होते.
पुढे बोलताना समतादूत प्रज्ञा राजुरवाडे म्हणाल्या की रमाई या मानसीक सक्षम होत्या म्हणूनच डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांना आपल्या दुखाची जानीव होवु दिली नाही.बाबासाहेब यांच्या शिक्षणासाठी त्याकाळात 14 रुपये ची मनिऑर्डर पाठविली होती.यावरुन रमाई ह्या आर्थिक बुधिमान होत्या.वस्तीगृहातील मुलाच्या जेवनासाठी सोन्याच्या बांगड्या विका,गहान ठेवा,आणि मुलाच्या जेवनाची व्यवस्था करा असे सांगत होती.अशी कारुण्यमुर्ति, मौल्यवान निस्वार्थी व्यक्तिमत्व रमाई होय.
घर परिवाराचा सांभाळ करित असताना एक आदर्श पत्नी,सुन,माता चळवळीतिल महिलाना मार्गदर्शक म्हणून भूमिका पार पाडल्या.घरातिल आर्थिक संकटाचा कोनासही थांगपत्ता लागू दिला नाही,की कधी ही आपल्या अथांग दुखाचे भाण्डवल करत रडत बसल्या नाही,इतक्या स्वाभीमानी त्या होत्या.
डॉ.बाबासाहेब आंबेडकर म्हणत रामू मानसाला दुख मोठे करतात,सुख मानसाला मोठे करत नाही,ज्याना मोठे व्हायचे असते ना ते लोक दुखाचे आभर मानतात,या आपल्या आयुष्यातील दुखाचे आभार व्यक्त कर..
बहिस्कृत भारतमध्ये बाबासाहेब लहितात रामू महान आहे,पन मला दिवसातुण 24 तासापैकी अर्धा तास सुधा मी रामू ला देवू शकत नाही ही खंत मनात ठेवतात.तेव्हा रमाई त्यागप्रिती होत्या,बाबासाहेब म्हणाले रामू खरी धनवान आहे, तिचि खुप उधारी माज्यावर आहे. रमाईने बाबासाहेब यांना एकदा सांगीतले की महिला माजी चेष्टा करतात.
सोन्याचा दागिना नाही आहे माज्याकडे म्हणून बाबासाहेब म्हणाले कोट्यावधी समाजाचा मोलाचा दागीना रामू तुच आहेस.रमाईच्या हृदयाचा चांगूलपणा,चारीत्र्याची शूध्दता, त्याग,संगर्ष,मातृत्व,प्रेम प्रामाणिकपना,सतत काळजी करणारे हृदय बघुन बाबासाहेबाच्या निस्सीम प्रेमाने रमाईला समजदार बनवले.
रमाईने आपल्या संसारात तक्रार केली नाही स्वाभीमानी जिवन जगत असताना बाबासाहेब यांना आत्मविश्वास,प्रेरणा देत मोलाची साथ दिली.
म्हणूनच डॉ.बाबासाहेब आंबेडकर हे भारताचे सविधान लिहु शकले.कोटीकोटी जनाचे क्रांतीसुर्य ठरले,जगाला आदर्श असे व्यक्तिमतव बाबासाहेबांच्या रुपात मिळाले.तेव्हा सर्व महिलानी आपल्या दुखाला येवढे मोठे करु नका ज्यात तुमची मानसिक प्रकृती बीघडेल.
मुलाना उच्च शिक्षणाप्रती प्रोत्साहीत करा,कुठल्याही संकटात धर्यवाण बना,खचुन जावु नका,तुमच्या आदर्श विचारातुन दुसऱ्यांना जिवन जगण्यास प्रेरित करा असे स्विस्तर मार्गदर्शन समतादूत प्रज्ञा राजूरवाडे यांनी केले.
यावेळी रमाई महिला मंडळ सावरी बिड तर्फे प्रज्ञा राजुरवाडे, अम्बिका बैले,अधीवक्ता मनिषा पाथोडे यांना रमाई मुर्ति व सविधान हे पुस्तक देवून सन्मानित करण्यात आले.
या कार्यक्रमाचे सुत्रसंचालंन सिमाताई शेंडे यांनी केले तर प्रास्ताविक पौर्णिमाताई रामटेके यांनी केले व आभार अस्मिताताई बैले यांनी मानले.