युवराज डोंगरे
उपसंपादक
खल्लार नजिकच्या उपराई येथे प्रभाकर महाराज राऊत यांच्या ४० दिवसाच्या उपवासानिमित्त शिव डोमन शेष महाराज संस्थान उपराई येथे दरवर्षीप्रमाणे यावर्षी सुद्धा श्रीमद् भागवत सप्ताह व यात्रा महोत्सवाचे आयोजन करण्यात आहे.
भागवताचार्य ह.भ.प देवगिरी महाराज बेंबळा खुर्द यांच्या वाणीतून १२ फेब्रुवारी ते १९ फेब्रुवारी पर्यंत भागवत कथेचे आयोजन केले आहे. या भागवत सप्ताहात रोज दैनंदिन कार्यक्रमाचे आयोजन केले आहे. या कार्यक्रमाची सांगता १९ फेब्रुवारी सोमवारला सकाळी ९ ते ११ ह.भ.प देवगिरी महाराज यांचे काल्याचे किर्तन होईल दुपारी १२ नंतर गावांमधून मिरवणूक निघणार आहे.
या मिरवणुकीमध्ये ढोल भजन मंडळ बेंबळा, वारकरी भजन मंडळ शिंगणापूर, वारकरी भजन मंडळ कसबेगव्हान,ढोल भजन मंडळ नावेड, ढोल भजन मंडळ चंडिकापूर, इत्यादी दिंड्या सहभागी होणार आहे. शोभायात्रेनंतर दहीहांडीचा कार्यक्रम शंकरराव पंजाबराव राऊत यांच्या हस्ते होणार आहेत. त्यानंतर महाप्रसादाचे आयोजन केले आहे. भाविक भक्तांनी या यात्रा महोत्सवाचा लाभ घ्यावा असे आवाहन डोमनशेष महाराज संस्थान उपराई यांच्या वतीने करण्यात आले आहे.