कमलसिंह यादव
प्रतिनिधी
कन्हान : – मराठा सेवा संघ कन्हान व्दारे राजे छत्रपती शिवाजी महाराज जयंती निमित्य क्रिडा क्षेत्रात प्राविण्य प्राप्त विद्यार्थी व मान्यवरांचा सत्कार करून राजे शिवराय जयंती महोत्सव साजरा करण्यात येणार आहे.
राजे छत्रपती शिवाजी महाराज यांची जयंती महोत्सव रविवार (दि.१९) फेब्रुवारी २०२३ ला मराठा सेवा संघ कन्हान व्दारे सकाळी ७.३० वाजता संत तुकाराम महाराज मंदीर, तुकाराम नगर कन्हान येथे जगतगुरू संत तुकाराम महाराज यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून कार्यक्रमाची सुरूवात करण्यात येईल शिव मिरवणुक तुकाराम नगर, शहीद चौक, तारसा रोड चौक, आंबेडकर चौक ते शिवाजी नगर कन्हान येथे पोहचुन सकाळी ८.३० वाजता शिवाजी महाराज स्मारक शिवाजी नगर कन्हान येथे शिवाजी महाराजांच्या पुतळयास मान्यवरांच्या हस्ते माल्यार्पण करून अभिवादन करून क्रिडा क्षेत्रात प्राविण्य प्राप्त विद्यार्थ्यांचा व इतर विविध क्षेत्रात उल्लेखनिय कार्य करणा-या मान्यवरांचा सत्कार सोहळ्याने राजे छत्रप ती शिवराय जयंती महोत्सव साजरा करण्यात येणार आहे. करिता कार्यक्रमास बहु संख्येने उपस्थित राहुन कार्यक्रमाचा लाभ घ्यावा असे आवाहन मराठा सेवा संघ शाखा कन्हान व्दारे करण्यात आले आहे.