डॉ.जगदीश वेन्नम
संपादक
युवक या देशाचा आधारस्तंभ असुन युवकांनी खेळासोबत सामाजिक बांधिलकी जोपासात व्यक्तीमत्व विकासाला चालना घ्यावी तसेच आपल्या अंगी असलेल्या सुप्त गुणांच्या विकास करावा तसेच शरीरयष्टी साठी व्यायाम सोबत विविध खेळ खेळणे आवश्यक आहे.असे प्रतिपादन जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्ष श्री.अजयभाऊ कंकडालवार यांनी केले,अहेरी तालुक्यातील कमलापूर ग्राम पंचायत अतंर्गत येत असलेल्या चिंतलगुड्डा येथे गोंडवाना युवा क्रिकेट क्लब च्या वतिने आयोजित भव्य टेनिस बाल सामन्यांच्या उदघाटन प्रसंगी उदघाटन स्थानावरून बोलत होते,पुढे बोलताना म्हणाले आज ग्रामीण असो किंवा शहरी असो प्रत्येक ठिकाणी व्हलिबाल, क्रिकेट,कबड्डी स्पर्धा आयोजीत करण्यात येत आहेत प्रत्येक ठिकाणी माझ्या स्वतः कडून व आदिवासी विध्यार्थी संघाकडून पारितोषिक देत असताना आम्हाच्या एकच उद्देश्य आहे.
युवकांना खेळण्यासाठी एक व्यासपीठ तयार झाले पाहिजे व एक चांगल खेळाडू तयार झाले पाहिजे तेव्हाच तर आपल्या गावाच्या व तालुक्याच्या नावलौकीक होत असतो.हे होत असताना गावातीला सामाजिक,शैक्षणिक,व विकासाबाबतीत चर्चा घडून येत असते व समस्याच्या निराकरण होत असते मात्र आजची परिस्थिती खूपच्या बिकट आहे,गेल्या पंचहत्तर वर्षापासून आपण या भागातून लोकप्रतिनिधि म्हणून खासदार,आमदार,जिल्हा परिषद सदस्य,पंचायत समिति सदस्य,सरपंच असे सर्वांना मत देवून निवडून देत असतो मात्र निवडून आल्यावर दुर्लक्ष केल्या जात आहे,प्रत्येक लोकप्रतिनिधी निवडून आल्यावर जर वर्षातून एक-दोन लाखांचे जरी विकास कामे केल्यास गावांच्या कायापलट झाले असते मात्र निवडून आलेले लोकप्रतिनिधी याकडे दुर्लक्ष करतात त्यामूळे योग्य लोकप्रतिनिधींना आपण निवडनूकीत द्यावी असे मत यावेळी व्यक्त केले.यावेळी माजी सभापती श्री.भास्कर तलांडे यांनी मार्गदर्शन करतांना म्हणाले खेळाडूंनी त्यांच्यात असलेले सुप्त गुणांना वाव द्यावे,व पंचांनी योग्य निर्णय देवून सदर स्पर्धा खेळिमेळीचे वातावरणात पार पाडवी असे मार्गदर्शन केले.या स्पर्धा मध्ये प्रथम पुरस्कार २१,००० हजार रुपये, दितीय १५,००० हजार रुपये ,तर तृतीय ११,००० हजार रुपये,असे याठिकानी पारितोषिक देण्यात येणार आहेत..!!
या कार्यक्रमाच्या उदघाटक म्हणून जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्ष श्री.अजयभाऊ कंकडालवार होते,तर अध्यक्षस्थानी अहेरी पंचायत समितीचे माजी सभापती श्री.भास्कर तलांडे होते तर प्रमुख पाहुणे म्हणून माजी जिल्हा परिषद् सदस्य श्री.अजय नैताम,पंचायत समितीचे माजी सभापती सौ.सुरेखा आलाम,प्रशांत गोडशेलवार नगर सेवक अहेरी, श्रीनिवास पेंदाम सरपंच, सचिन ओलेट्टीवार उपसरपंच,सौ. कलावती कोंड्रावार ग्रा.पं.सदस्य,दीपक आलम,लक्ष्मण कोडापे ग्रा.पं सदस्य रेपणपली, इंदुताई पेंदाम ग्रा.पं सदस्य,छाया सडमेक,गणेश सिडाम माजी सरपंच, नागेश कन्नाके सरपंच राजाराम,आविस कार्यकर्ते संतोष सिडाम, राकेश सडमेक,श्रीनिवास राऊत, नरेंद्र गर्गम, राकेश सडमेक्,प्रकाश दुर्गे, विलास सिडाम, वासुदेव सिडाम, कोरके पाटिल आसा, नागेश मडावी, कोंड्रावार उमेश भिमंनपली, संजय मडावी, दिवाकर आलम, मंडळाचे अध्यक्ष कैलास मडावी, तिरपती पाणेम, धीरज पेंदाम रुपेश पेंदाम ,संतोष पेंदाम, सुभाष आलम, संतोष कासुलवर सह मंडळाचे सदस्य व गावांतील महिला पुरुष उपस्थीत होते..!!