
ऋग्वेद येवले
उपसंपादक
दखल न्युज भारत
साकोली :- अनंत श्री विभुषित जगद्गुरु रामानंदाचार्य श्री स्वामी नरेंद्राचार्य महाराज, जगद्गुरु रामानंदाचार्य दक्षिण पीठ नाणीज,महाराष्ट्र तर्फे जगद्गुरु नरेंद्राचार्य महाराज संस्थांनच्या माध्यमातून रक्ताची गरज लक्षात घेता संपूर्ण महाराष्ट्रात रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे.
गरजूंना वेळेत रक्त उपलब्ध व्हावे,रक्ता अभावी कोणाचा मृत्यू होऊ नये, या अनुषंगाने जगद्गुरु नरेंद्राचार्य महाराज संस्थानतर्फे उपजिल्हा रुग्णालय साकोली येथे रक्तदान महायज्ञ शिबिराचे आयोजन करण्यात आले होते. या रक्तदान शिबिराला जनतेचा उत्तम प्रतिसाद मिळाला असून एकूण १६१ रक्तदात्यांनी रक्तदान केले.
जगदगुरु श्री स्वामी नरेंद्राचार्य सेवा संस्थान आयोजित यांच्या माध्यमातून दि.१७ जानेवारी २०२५ रोजी साकोली तालुक्याच्या वतीनं उपजिल्हा रुग्णालयात रक्तदान शिबीराचे आयोजन करण्यात आले होते.
या शिबीरात जमनापुरच्या सरपंचा पुजा देशमुख,माजी नगरसेविका मीनाताई लांजेवार,माजी नगरसेवक मनिष कापगते, जिल्हा निरिक्षक संतोष भुरे,जिल्हाध्यक्ष नितेश वंजारी, तालुकाध्यक्ष के.डि.लांजेवार,सामाजिक कार्यकर्ते आशिष गुप्ता,विजय दुबे,नरेश कऱजेकर,उमेश भुरे, पंकज मुंगुलमारे, विकास कापगते, राहुल आवरकर, वैद्यकीय अधिकारी डॉ.गजभिये, डॉ. बडवाईक, डॉ. गाडबैल,महिला जिल्हाध्यक्षा वर्षा फंदे,कुंदा मुंगुलमारे, प्रशांत गुरव,राजु फंदे,विमल राहांगडाले, पत्रकार ऋग्वेद येवले, मनिषा काशीवार,डी.जी.रंगारी,चेतक हत्ती मारे व अनेक मान्यवर अतिथी म्हणून उपस्थित होते.
सर्व प्रथम स्वामी नरेंद्राचार्य महाराज यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून दर्शन घेतले. त्यानंतर आयोजित करण्यात आलेल्या रक्तदान शिबिराचे उद्घाटन केले.
कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे आशिष गुप्ता यांनी उद्घाटन प्रसंगी स्वतः रक्तदान करून कार्यक्रमाची सुरुवात केली.
यावेळी जमनापूरच्या सरपंच कार्यक्रमाचे अध्यक्ष सौ.पूजा देशमुख यांनी रक्तदान हे श्रेष्ठदान आहे सामाजिक बांधिलकीची जाण ठेवून आपण समाजाचे काहीतरी देणे लागतो, या भावनेने प्रत्येकाने समाज कार्य करणे आवश्यक आहे.
रक्तदान ही केवळ एक चळवळ नसून मानवतेची सेवा आहे या चळवळीत जास्तीत जास्त नागरिकांनी सहभागी व्हावे आणि समाजाप्रती आपले कर्तव्य पूर्ण करावे असा संदेश दिला.
यावेळी जिल्हा सामान्य रुग्णालयाची रक्तपेढी तसेच समर्पण रक्तपेढी भंडारा उपस्थित होती.
याप्रसंगी प्रकाश कोवे, भावेश लांजेवार,खुमचंद राणे,लक्ष्मण राऊत, देवमन मानकर, झामदेव येवले, सुधीर हेमने ,प्रकाश बोरकर, विलास लांजेवार, शांताराम प्रत्येके व उपजिल्हा रुग्णालयातील कर्मचारी तसेच साकोली तालुक्यातील भाविकांनी या कार्यक्रमाप्रसंगी अथक परिश्रम घेतले.