शंकरपूर येथे विविध कार्यक्रमांतर्गत श्री.संत जगनाडे महाराज यांचा पुण्यतिथी महोत्सव संपन्न…

शुभम गजभिये 

  विशेष प्रतिनिधी 

        दिनांक १५ जानेवारी २०२५ ला शंकरपूर येथे श्री.संताजी जगनाडे महाराज पुण्यतिथी महोत्सव उत्साहात संपन्न झालाय.

      श्री.संत जगनाडे महाराज पुण्यतिथी निमित्ताने गुणगौरव सोहळा आणि समाज प्रबोधन कार्यक्रम साजरा झाला.

                त्या प्रसंगी उपस्थित कार्यक्रमाचे अध्यक्ष श्री.प्राचार्य.विठ्ठलराव निखुले हे होते तर कार्यक्रमाचे उद्घाटक म्हणून श्री.गजाननराव भजभुजे अधक्ष ए.ते.समाज नागपूर हे होते.

      विशेष अतिथी म्हणून श्री. अँड.अभिजित वंजारी आमदार विधान परिषद नागपूर,श्री.डॉ.सतीशभाऊ वारजूकर मा.जि.प.अधक्ष चंद्रपूर,श्री. साईशजी वारजुकर सरपंच ग्रा.पं.शंकरपूर,सौ.ममताताई डुकरे मा.जि.प.सदस्या चंद्रपूर,सौ.भावनाताई बावनकर मा.प.स.सदस्या चिमूर,श्री. डी.के.निकुरे नायब तहसिलदार चिमूर,सौ.सविताताई चौधरी सदस्या ग्रा.प.शंकरपूर,श्री.डॉ.परसराम नागोसे ब्रम्हपुरी,श्री.भाऊरावजी बावनकर अधक्ष सोसायटी शंकरपूर,श्री.सतीशजी देव्हारे अधक्ष ए.ते.समाज खडसंगी,श्री.ईश्वरभाऊ डुकरे अधक्ष तेली समाज चिमूर,श्री.विनोदभाऊ नागोसे चिंधीचक,श्री.प्रेमनाथ ठाकरे सचिव ए.ते.समाज भिवापूर,सौ.वंदनाताई सहारे सदस्या ग्रा.प.शंकरपूर,श्री.वसंताजी चौधरी अधक्ष सर्वज्ञ बहुद्देशीय शिक्षण संस्था शंकरपूर,श्री.संदीपभाऊ ठाकरे सदस्य ग्रा.प.चक (लोहरा), इत्यादी उपस्थित होते.

                शंकरपूर येथे दिनांक १५ जानेवारी २०२५ ला श्री.संताजी जगनाडे महाराज पुण्यतिथी महोत्सव,गुणगौरव सोहळा,समाज प्रबोधन कार्यक्रम साजरा झाला.

           या प्रसंगी श्री. अँड.अभिजितजी वंजारी आमदार विधान परिषद नागपूर यांनी आपल्या मनोगतात श्री.संताजी जगनाडे महाराज देवस्थान परिसरात एक भव्य दिव्य ई लायब्ररी देणार असे आस्वसित केले. 

       तद्वतच प्राचार्य विठ्ठल रावजी निकुरे यांनी आपल्या अध्यक्षीय भाषणात समाजाला मार्गदर्शन केले. 

     तदनंतर विद्यार्थ्यांचा सत्कार करण्यात आला.कु.वैष्णवी अर्जुन निकुरे वर्ग दहावी,कु.रिद्धिमा गुरुदेव कावळे वर्ग दहावी,कु.वैभव दौलत कडकडे वर्ग बारावी,कु.स्वाती सुनील चौधरी वर्ग बारावी या चार विद्यार्थ्यांचा सत्कार करण्यात आला.

      विशेष म्हणजे श्री.अशोक चौधरी अधक्ष श्री.संताजी जगनाडे महाराज देवस्थान शंकरपूर यांच्या संकल्पनेतून तेली समाजात १ जानेवारी २०२४ नंतर ज्या घरी मुलगी जन्माला आली,त्या मुलीच्या आई वडीलचा प्रत्येक वर्षी याच कार्यक्रमात अशोक चौधरी यांच्या कडून आईला साडी,मुलीला ड्रेस,वडीलाला दुपट्टा देऊन दरवर्षी नवजात मुलगी जन्माला आलेल्या मुलीच्या आई वडीलाचा सत्कार करण्यात येईल असा नवीन उपक्रम दरवर्षी राबविला जाईल असे सांगितले.

         सौ.करिष्मा प्रमोद चौधरी, सौ.रोशनी रोशन सहारे,या दोन नवजात मुलीच्या आईंचा सत्कार करण्यात आला.

         कार्यक्रम यशस्वी करण्याकरिता बंडू भजनकर,प्रमोद साहारे,नरेंद्र आदमने,रवींद्र राखडे, रवि भजनकर,आशिष नागोसे अरविंद राखडे, मधुकर राखडे, शरद निकुरे,कैलास सहारे, सचिन निकुरे, रवींद्र कोलते, रामकृष्ण समर्थ,संदीप ठाकरे, दिनेश दुरबुडे,अविनाश सहारे, गुरुदास भजनकर,वंदना सहारे, रंजना दुरबुळे,पुष्पा राखडे,यांनी परिश्रम घेतले.

        कार्यक्रमाचे प्रास्ताविक मंडळाचे अध्यक्ष श्री.अशोक चौधरी यांनी केले तर आभार प्रदर्शन सौ.शिल्पा गुरुदेव कावळे यांनी केले.