वंचित बहुजन आघाडी अमरावती पश्चिम विभाग प्रमुखांची 19 जानेवारीला बैठक…

युवराज डोंगरे /खल्लार 

           उपसंपादक

              वंचित बहुजन आघाडी अमरावती पश्चिम विभाग,जिल्हा कार्यकारणी व सर्व तालुका प्रमुख ,युवक तालुकाप्रमुख ,महिला तालुका प्रमुख, सम्यक विद्यार्थी आंदोलन तालुकाप्रमुख यांची बैठक दि. 19 जानेवारीला जि प विश्रामगृह दर्यापूर येथे आयोजित करण्यात आली आहे.

             आगामी काळात होऊ घातलेल्या जिल्हा परिषद,पंचायत समिती,महानगरपालिका,नगरपालिका निवडणुका संदर्भात उमेदवार अर्ज भरण्याकरिता व पक्षामध्ये नवीन कार्य करण्या करिता गठीत केलेल्या त्याचा प्रस्ताव जिल्हा कमिटीसमोर सादर करण्यासंदर्भात पक्ष संघटन मजबुतीकरण वार्डशाखा बूथ प्रमुख यांच्या बांधणीसाठी विविध विषयावर चर्चा करण्याकरिता  दिनांक 19 जानेवारी 2025 रोज रविवारला दुपारी एक वाजता विश्रामगृह दर्यापूर येथे बैठकीचे आयोजन करण्यात आले आहे.

            जिल्हा प्रमुख संजय चौरपगार, महासचिव साहेब वाकपांजर, महासचिव अशोक नवलकर यांनी केले आहे.

         तरी सर्व वंचित बहुजन आघाडीच्या पदाधिकारी प्रमुख कार्यकर्ते यांनी न चुकता हजर राहावे असे आवाहन संजय चौरपगार जिल्हाप्रमुख वंचित बहुजन आघाडी पश्चिम विभाग यांनी केले आहे.