नेरी ग्रामपंचायतची अतिक्रमण हटाव मोहिम,जेसीबीच्या सहाय्याने काढले अतिक्रमण…

   उपक्षम रामटेके

मुख्य कार्यकारी संपादक 

   शुभम गजभिये 

      विशेष प्रतिनिधी 

         चिमुर तालुक्यातील नेरी ग्रामपंचायत अंतर्गत असलेले वाढते अतिक्रमण हा चिंतेचा विषय बनला आणि शासनाच्या योजना बांधकाम करण्याच्या जागेवर काहींनी अतीक्रमण करुन टाकले.

           हे अतिक्रमणे काढून घेण्याची अनेकदा ग्रामपंचायतला मागणी करण्यात आली होती तसेच समाज माध्यमांमध्ये करण्यात येत होती. आज अखेर नेरी ग्रामपंचायतचा मुहूर्त निघाला ग्रामसभा आयोजित होती. ग्रामसभेत नागरिकांनी अतिक्रमण हटविण्यात यावे अशी मागणी रेटून धरली होती. 

             त्याअनुषंगाने नेरी ग्रामपंचायत ने जेसीबीच्या सहाय्याने पोलिस संरक्षणाखाली संविधान सभागृहाच्या भवनासाठी नेरी ग्रामपंचायतने निर्गमित केलेल्या सरकारी जागेवरील काहींनी अतिक्रमण करण्यात आले होते ते हटविण्यात आले. सरकारी जागेवरील अतिक्रमण हटाव मोहिम सुरूच राहणार असुन ज्यांचे अतिक्रमणे आहेत त्यांनी काढुन घ्यावे असे आवाहन ग्रामपंचायतनी केले आहे.

          अशाप्रकारचे अवैध बांधकामे हे सरकारने कायदेशीर रित्या पाडुन पर्यावरणाचा बचाव करावा अशी सुज्ञ नागरिकात चर्चा आहे.

    यावेळी ग्रामपंचायत सचिव,सरपंच, सदस्य, कर्मचारी, पोलिस कर्मचारी उपस्थित होते.