नायलॉन मांजाणे गळा चिरल्याने एक इसम जखमी… — नेरी येथील कन्या विद्यालय जवळील घटना…

         रामदास ठुसे 

नागपूर विशेष विभागीय प्रतिनिधी 

          चिमूर तालुक्यातील नेरी येथील रोशन लांजेकर युवा व्यवसायिक हे काही कामानिमित्त कन्या शाळे जवळून दुचाकीने जात असताना अचानक पंतगचा मांजा गळ्यासमोर आल्याने गळा चिरला गेला.

         दरम्यान त्यांनी तात्काळ मांजा हातात पकडल्यामुळे पुढील अनर्थ टळला असून गळा आणि हात चिरून दुखापत झाली आहे.

          नेरी येथील डॉ. वाघे यांच्याकडे प्राथमिक उपचार करून पुढील उपचार चिमूर येथील रुग्णालयात सुरू आहे.

          सदर प्रकरणी अज्ञात पतंग उडवणाऱ्या वर कारवाई करावी तसेच सदर विक्रेत्यांवर कारवाई करावी अशी अशी मागणी नागरिकांनी केली आहे.