
प्रदीप रामटेके
मुख्य संपादक
बांधकाम कशाही प्रकारे करा,आम्ही बांधकामांची बिले काढू म्हणणाऱ्या बांधकाम विभागाच्या अभियंत्यांना रोखणे आवश्यक झाले आहे.
मौजा हेट्टी (दाबका) येथील सभागृहाचे निकृष्ट-बोगस बांधकाम बघता संबंधित अभियंता गाढ झोपून असल्याचे दिसते आहे.
चंद्रपूर जिल्ह्यातंर्गत चिमूर तालुक्यातील मौजा हेटी (दाबका) येथील निकृष्ट दर्जाच्या सभागृह बांधकामांचे बिले संबंधित अभियंतांनी काढल्यास त्यांच्या विरुद्ध आणि त्यांच्यावर कारवाई करणे संबंधाने कोटगाव गटग्रामपंचायत परिसरात आमरण उपोषण केले जाणार आहे.
सभागृह बांधकाम संबंधाने दर्शनिय फलक न लावणे हा पहिला दोष संबंधित ठेकेदारांचा आणि अभियंत्यांचा आहे.
सभागृह बांधकामांचा दर्शनिय फलक लावण्यात आला नसल्याने ठेकेदार कोण आहे,बांधकाम कुठल्या निधी अंतर्गत आहे,बांधकामाचा मंजूर निधी किती आहे,कुठल्या विभागांतर्गत बांकाम करण्यात येत आहे हे कोटगाव गटग्रामपंचायत पदाधिकाऱ्यांना आणि मौजा हेट्टी (दाबका) येथील नागरिकांना माहिती नाही किंवा कळले नाही.
बांधकामाची इत्यंभूत माहिती नसल्यामुळेच संबंधित ठेकेदार व अभियंता मौजा हेट्टी येथील सभागृहाचे बांधकाम निकृष्ट दर्जाचे करतो आहे.
सभागृहाचे पायव्यावर अजिबात पाणी टाकण्यात आले नाही आणि स्लाॅबवर १० दिवसांनंतर पाणी टाकण्यात आले.सभागृहाच्या पायव्यावर आणि स्लाॅबवर पाणी न टाकण्याचा प्रकार कोणत्या नियमात बसतोय,हे संबधित कंत्राटदार आणि अभियंता सांगतिल काय?
सभागृहाचे बांधकाम पाडून दुसऱ्यांदा सभागृहाचे बांधकाम न केल्यास संबंधित ठेकेदार व अभियंता विरोधात गावकऱ्यांसह जेष्ठ पत्रकार आमरण उपोषण करणार आहेत…