
आम्हाला माहित आहे की, या पत्राने तुम्हा निर्लज्ज सरकारला काहीही फरक पडणार नाही….
परंतू , तरी सुद्धा तुम्ही सर्वजण संविधानिक पदावर (EVM मार्गाने का होईना झान्गडगुत्ता होऊन) बसलात. म्हणून तुम्हाला महाराष्ट्रीयन जनतेतर्फे तुम्हाला पुढील प्रश्न आहेत. त्या प्रश्नांची उत्तरे तुम्ही देणार नाहीत आणि देऊही शकणार नाहीत. कारण तुम्ही आमचे कल्याण करण्यासाठी म्हणून गेला नाहीत तर तुमचा स्वार्थ साधण्यासाठी म्हणून तीथे असंविधानिक मार्गाने EVM सरकार स्थापन करुन तिथे बसलात.
कारण तुम्ही सर्वजण महाराष्ट्रीयन जनतेच्या गळ्यातील ताईत झालात…..
288 पैकी 232 चा अर्थ तोच आहे ना……!
म्हणून तुम्हाला हे पुढील प्रश्न आहेत……
(1) भारताच्या संविधानातील अनुच्छेद क्र. 47 ची अंमलबजावणी करणार का…?
त्याचा अर्थ असा की, अल्कोहोलची निर्मिती केवळ आणि केवळ औषधीनिर्मित पुरतीच केली पाहिजे. त्यापेक्षा एक अंश सुद्धा जास्त नको…..!
मग तुम्ही दारूची दुकाने नव्हे, तर महाराष्ट्रातील दारूच्या कंपन्या कायम स्वरूपी बंद करणार का……?
(2) यापुढे एक रुपयाही कर्ज न काढता,महागाई अजिबात न वाढवता महाराष्ट्र सरकार चालवणार का…?
(3) देशात महाराष्ट्राची ओळख म्हणजे कर्जबाजारी होऊन आत्महत्या करणाऱ्या शेतकऱ्यांचे राज्य म्हणजे महाराष्ट्र राज्य. ही ओळख कायमची पुसून टाकणार का……?
(4) आज आता जवळपास 10 लाख कोटी रुपयांचे कर्ज महाराष्ट्रावर आहे. आणि आपल्या राज्याचे वार्षिक उत्पन्न केवळ साढेचार लाख कोटी रुपये आहे. तर कर्जमुक्त महाराष्ट्र तुम्ही कसा करणार त्याचे व्हिजन महाराष्ट्रीयन जनतेला सांगणार का…..?
(5) निवडणूकीच्या काळातील दिलेल्या आश्वासनांची 100% परिपूर्ती तुम्ही करणार का…..?
(6) बीड जिल्ह्यातील एका गावचे मुख्यमंत्री असलेले (सरपंच पद ) शहीद संतोष देशमुख यांचे मारेकरे, तसेच परभणीतील कायद्याचे विद्यार्थी असलेले शहीद सोमनाथ सूर्यवंशी यांचे मारेकरी शहीद नरेन्द्र दाभोळकरांच्या मारेकऱ्यांसारखेच मोकाट सुटणार का….?
(7) आपले अंथरून पाहुन पाय पसरावे असे ज्ञानाचे डोस पाजणाऱ्या सरकारने स्वतःकडे पहावे की, सरकारी तिजोरीत कर्जाशिवाय कर्मचाऱ्यांचे पगार सुद्धा करता येत नसतील, तर विकासाची कामे पूर्ण 100% बंद करा. केवळ त्यातून भ्रष्टाचार करता येतो आणि स्वतः सत्ताधाऱ्यांनाच पैसा कमविता येतो म्हणून पुन्हा महाराष्ट्र कर्जबाजारी करत जाणार का…..?
(8) तुम्ही जर खरोखरच जनतेच्या मतानुसार 232 ठिकाणी निवडून आला होता, तर मारकडवाडीचा प्रयोग तुम्ही का होऊ दिला नाही…..?
आज, आता, ताबडतोब कोणत्याही 288 पैकी 5 मतदार संघात बॅलेट पेपरवर निवडणुका घेऊन दाखवा…….
तुमचे (आज जे आमदार म्हणून निवडून गेलेले ) डिपॉझिट जप्त जर नाही झाले….
तर या अनंत भवरेला जाहीर चौकात फाशी द्या…..!
असे करणार का…..?
(9) महाराष्ट्रातील स्थानिक स्वराज्य संस्थेच्या, महानगर पालिकेच्या सर्व निवडणुका बॅलेट पेपरवर घेणार का…..?
(10) आम्ही राष्ट्रवादी काँग्रेस सोबत जाणार नाही, नाही, नाही…….
एक वेळ आम्ही अविवाहित राहू पण हे कदापि शक्य नाही, नाही, कदापि शक्य नाही. म्हणणारे तुम्ही. आज त्यांच्याच मांडीवर जाऊन बसलात ( गरज नसतानाही)…..!
असे हे तुमचे खोटारडे, निर्लज्ज, नपुसंक, अप्रामाणिक महाराष्ट्र सरकार…….
आमच्या स्वाभिमानी महाराष्ट्रावर राज्य करतोय…….
हीच शरमेची बाब आहे…!
परंतू , एक लक्षात ठेवा…….
हा म.फुले, छ. शिवरायांचा, छ. शाहू महाराज, डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचा महाराष्ट्र आहे. केवळ स्मारक आणि प्रतिमेपुढे नतमस्तक होऊन थांबणारा नाही. तर देशाला पुरोगामीत्वाची दिशा देणारा हा महाराष्ट्र आहे. तुम्ही एक वेळ दोन वेळ निर्लज्जपणे आम्हाला फसवू शकता. पण सर्वकाळ नाही फसवू शकत.
म्हणूनच म्हणतो , राज्य नीट संविधानिक मार्गाने चालवा. आम्ही तर EVM ला कायमचे मातीत गाडण्याची तयारी करत आहोतच शिवाय……
डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी लिहून प्रदान केलेल्या……
भारताच्या संविधानातील प्रत्येक कोहिनुर हिऱ्यांची ओळख बहुजन ओबीसी बांधवापर्यंत पोहचवण्यासाठी आम्ही संविधानवादी कटीबद्ध आहोत…..