घनश्याम पिसे कृषी संशोधन केंद्रातर्फे एक दिवसीय मशरूम लागवड व विक्री सहाय्य कार्यशाळेचे रविवारी आयोजन…

शुभम गजभिये 

 विशेष प्रतिनिधी 

         चिमूर तालुक्यातील कोलारा गेट सातारा येथील घनश्यामजी पिसे कृषी संशोधन केंद्रात दि. १९ जानेवारीला एक दिवसीय मशरूम लागवड व विक्री सहाय्य कार्यशाळेचे आयोजन करण्यात येत आहे.

         चिमूर विधानसभेत शेतकरी व बेरोजगारी यांची समस्या अतिशय बिकट आहे, यावर उपाय म्हणून कोलारा गेट सातारा येथे घनश्यामजी पिसे कृषी संशोधन केंद्राची स्थापना करण्यात आली असून याअंतर्गत नवनवीन प्रकल्प राबविण्यात येत असतात.

         शेतीमध्ये भातपिकातून तयार झालेली तनस, कोंडा व कुटार यांचा वापर करून मशरूम चे उत्पादन घेतले असता शेतकऱ्यांना घरीच भरघोस आर्थिक उत्पन्न घेता येते, यासाठी मशरूम ची लागवड कशी करायची, तयार झालेले मशरूम बाजारपेठेत कुठे व कशे विकायचे यावर तज्ञांचे मार्गदर्शन दिले जाणार आहे व उत्पादन करणाऱ्या शेतकऱ्यांचे विक्री साठी नोंदणी करण्यात येणार असून प्रशिक्षणानंतर शेतकऱ्यांना प्रमाणपत्र वितरीत करण्यात येईल.