खल्लार सर्कलला रुग्णवाहीका उपलब्ध करुन देण्यात यावी, सह्याद्री युवा विचारमचंची खासदार नवनीत राणा यांच्याकडे मागणी…

युवराज डोंगरे/खल्लार

         उपसंपादक 

 खल्लार परिसरात नव्यानेच स्थापन झालेल्या सह्याद्री युवा विचार मंच खल्लार सर्कलला आज (१७) खासदार सौ नवनीत ताई राणा ह्यांनी भेट दिली.खल्लार सर्कलला रुग्णवाहीका मिळण्यात यावी अशी मागणी केली.

            खासदार नवनीत राणा यांनी तत्काळ जिल्हा आरोग्य अधिकारी यांच्याशी संपर्क करून खल्लार सर्कल रुग्णवाहीकेबाबत सूचना दिल्या व येत्या काही दिवसातच रुग्णवाहीका ही आपल्या सेवेत सादर होईल असे आश्वासन दिले.

              तसेच युवा मंचाच्या वतीने शेतकऱ्याच्या मालाला हमीभाव व मध्यप्रदेश मध्ये राबवण्यात येणारी भावांतर योजना आपल्या इथे पण राबवण्यात  यावी अशी मागणी केली असता खासदार नवनीत राणा यांनी ती पूर्ण ऐकून व समजून घेतलीत व त्यांच्या योग्य अभ्यास व पाठपुराव्या साठी खासदार निवास अमरावती येथे सह्याद्री युवा विचार मंच खल्लार सर्कल ला आमंत्रित केले.

             सामाजिक कार्यासाठी नव्याने तयार झालेल्या सह्याद्री युवा विचार मंच खल्लार सर्कलचे खासदार यांनी कौतुक केले. ‘सहयोग सेवा समर्पण ह्या तुमच्या ब्रीदवाक्या प्रमाणे समाजसेवा करत राहा मी नेहमी मदत, सहकार्यस तुमच्या सोबत आहे असे आश्वासन यावेळी  नवनीत राणा यांनी युवा मंचास दिले.

            ह्यावेळी सह्याद्री युवा विचार मंचाचे  निलेश मोपारी अंकुश रहाटे, निलेश जुनघरे विशाल खराडे, शैलेश मेटकर, चेतन जुनघरे, बाबूरावजी नितनवरे, नितीन सिरसकार, सुभाष हरणे, प्रविण घाणे, सोपान घुरडे, किशोर पोटे, प्रविण कोरपे, गोपाल यादव, आकाश चौधरी, राहूल सगणे,साहिल सगणे, ऋषी सवाई, ऋषि मोपारी, सुनिल तायडे, सिद्धेश घुरडे, राजीक शहा, नितेश तायडे, आबाराव इंगळे, श्रीलेश मोपारी, सत्यजीत वर्धे, धनेश मोपारी, विनोद इंगळे, मंगेश वानखडे, सुमित वानखडे, जावेद शेख, प्रफुल इंगळे, जमील खा पठाण ह्यांच्या सह  नागरिक उपास्थित होते.