राकेश चव्हाण
कुरखेडा तालुका प्रतिनिधी
दिनांक 16 जानेवारी 2024 ला सायंकाळी जवळपास 5.30 वाजे दरम्यान लागतच्या चंद्रपूर जिल्ह्यातील सुरबोडी येथील आशिष कांबडी हा युवक वडसा येथून आपले काम आटोपून गावाकडे निघाला होता.
परंतु ब्रम्हपुरी रोड वर अचानक एक माकडं त्याच्या गाडीखाली आल्यामुळे आशिष हा गाडीखाली पडून गंभीररीत्या जखमी होऊन पडलेला होता,त्याचा हात व पाय मोडलेला होता.
जनसेवा हीच ईश्वर सेवा समजणारे चावला बंधूनी क्षणाचाही विलंब न लावता सदर युवकांस ताबडतोब दवाखाण्यात भरती केले, व त्याच्या नातेवाईकाना निरोप देऊन पुढील उपचारासाठी ब्रह्मपुरीला हलविण्यासाठी मदत केली.
त्यांच्या या मदतीमुळे एका होतकरू तरुणाचे प्राण वाचविल्यामुळे संपूर्ण परिसरातून जप्पा चावला बंधुच्या या कार्याची प्रसंशा होत आहे.