चिमुरात काँग्रेसचा यशस्वी ‘चक्काजाम’.. — तहसील कार्यालयावर मोर्चेकरांची धडक.. — अधिकाऱ्यांची दांडी.. — डॉ.सतिश वारजूकर व गजानन बुटके यांनी केले मोर्चाचे नेतृत्व..

     रामदास ठुसे

विशेष विभागीय प्रतिनिधी..

चिमूर:-

        तालुक्यासह जिल्ह्यातील शेतकरी अनेक समस्यांनी ग्रासला आहे. त्यामुळे शेतकऱ्यांच्या समस्याकडे प्रशासनाचे लक्ष वेधण्यासाठी चिमूर तालुका काँग्रेस कमिटीच्या वतीने शुक्रवारी उपविभागीय अधिकारी कार्यालयावर काल मोर्चा काढण्यात आला होता. 

         या मोर्चादरम्यान,चिमुरात चक्काजाम करण्यात आल्याने मोठ्या प्रमाणात वाहतूक विस्कळीत झाली होती.चिमूरचे आराध्य दैवत श्री.बालाजी मंदिर येथून मोर्चाला सुरुवात करण्यात आली. 

 

           मोर्चा एसडीओ कार्यालयासमोर आल्यावर मोर्चाचे रूपांतर सभेत झाले. मोर्चाचे नेतृत्व माजी जि.प. अध्यक्ष डॉ. सतीश वारजूकर,माजी जिल्हा परिषद सदस्य गजानन बुटके यांनी केले.

             शेतकऱ्यांना सोयाबीनच्या नुकसानीची सरसकट नुकसान भरपाई देण्यात यावी,गोसीखुर्दचे पाणी शेतकऱ्यांना देण्यात यावे तसेच नवीन दराने शेतकऱ्यांच्या जमिनीचा मोबदला देण्यात यावा,रस्त्यांच्या कामात सुरू असलेला भ्रष्टाचार बंद करण्यात यावा,शेतकऱ्यांना टोल फ्री नंबरवर पीकविमा कंपनीकडून प्रतिसाद मिळत नाही व प्रचंड भ्रष्टाचार करून पीकविमा कंपन्या मालामाल झालेल्या आहे,शेतकऱ्यांनी कापूस,धान पिकाचा विमा उतरविला परंतु बऱ्याच शेतकऱ्यांनी पाऊस उशिरा सुरू झाल्यामुळे कापसाचा विमा काढला,सोयाबीनचा विमा काढला.खते,बी-बियाणे,कीटकनाशके,महागड्या औषधी वापरुनही बुरशीजन्य रोगाने सोयाबीन पिकले नाही पशुवैद्यकीय दवाखान्यामध्ये जनावरांसाठी औषधी उपलब्ध नाही,पशु आरोग्य व्यवस्था कोलमडली आहे आदी मागण्यांकडे लक्ष वेधत हे लक्षवेधक आंदोनल करण्यात आले होते.

          मोर्चात चिमूर तालुक्यातील हजारो शेतकऱ्यांसह सेवादलाचे महाराष्ट्र राज्य सहसचिव प्रा.राम राऊत,प्रदेश काँग्रेसचे महासचिव डॉ.नामदेव किरसान,महाराष्ट्र राज्य ओबीसी संघटक धनराज मुंगले,जिल्हा सरचिटणीस गजानन बुटके,तालुका अध्यक्ष डॉ.विजय गावंडे,विलास डांगे,संजय डोंगरे,किशोर शिंगरे,माधव बिरजे,अविनाश अगडेसह इतर कार्यकर्ते सहभागी झाले होते.