विद्या प्रतिष्ठान इंदापूर इंग्लिश मीडियम स्कूलच्या विद्यार्थ्यांचे राज्यस्तरीय हँडबॉल स्पर्धेमध्ये सुवर्ण कामगिरी.:- आमदार दत्तात्रय भरणे…

 बाळासाहेब सुतार

नीरा नरसिंहपूर प्रतिनिधी

            क्रीडा व युवक सेवा संचलनालय महाराष्ट्र राज्य जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालय नाशिक यांच्या संयुक्त विद्यमाने राज्यस्तरीय शालेय हँडबॉल क्रीडा स्पर्धा दिनांक 5 ते 8 नोव्हेंबर रोजी सिन्नर या येथे पार पडले. या स्पर्धेमध्ये विद्या प्रतिष्ठान इंदापूर इंग्लिश मीडियम स्कूल इंदापूर च्या 14 वर्ष मुलींच्या संघाने महाराष्ट्रात राज्यात प्रथम क्रमांक मिळवला तसेच 17 वर्षे मुलींच्या संघाने ही तृतीय क्रमांक मिळवला.

            यानिमित्ताने इंदापूरचे आमदार दत्तात्रय भरणे यांनी सर्व मुलींचा व पालकांचा सत्कार सन्मान केला यावेळी इंदापूर तालुक्यातील सर्व प्रतिष्ठित मान्यवर उपस्थित होते.14 वर्ष वयोगटातील 4 मुलींची 1)समता पिंटू पाटील, 2) सिद्धी सागर गांधी, 3) सई संजय कदम, 4) प्रणिती पोपट शिंदे व 17 वर्ष वयोगटातील श्रावणी भोसले यांची राष्ट्रीय स्पर्धेसाठी महाराष्ट्राच्या संघातनिवड झाली तसेच 17 वर्ष वयोगटातील पलक विकास बलदोटा हिची Standby खेळाडू म्हणून निवड झाली.

       14 वर्ष मुलींचा सुवर्णपदक विजेता संघ* खलील प्रमाणे – सिद्धी गांधी, समता पाटील, सई कदम, प्रणिती शिंदे, सानिका वाघमारे, स्वराली झगडे, तन्वी राऊत, तनया पाटील, वैष्णवी रुपनवर, संस्कृती लटके, सिद्धी जगताप.

      17 वर्ष कांस्यपदक विजेता मुलींचा संघ खालील प्रमाणे- संस्कृती थोरात, समृद्धी भिसे,पलक बलदोटा, सिद्धी गुळूमकर, श्रावणी शिंदे, जुई बाब्रस, ऋतुजा पाटील, अनुष्का बोराटे, श्रावणी भोसले, आर्या मोहिते, आघाडी खरात पाटील, रिया घाडगे, राजनंदिनी परबत, लकीशा शेख, अनुष्का पाटील, आदिती बर्डे आदी खेळाडू उपस्थित होते.