दखल न्यूज भारत

विजय शेडमाके

 

दिनांक १७ जानेवारी २०२३

 

गडचिरोली: खासदार अशोकजी नेते यांच्या नेतृत्वात व मार्गदर्शनात परिक्षा पे चर्चा ही महत्वपुर्ण बैठक घेण्यात आली.

भारताचे विश्वगौरव आत्मनिर्भर भारताचे प्रणेते मान.पंतप्रधान नरेंद्र मोदीजी यांच्या संकल्पनेतून जी-२० जागतिक विश्वगुरु बनण्याच्या दुष्टीने भारताची वाटचाल,पंतप्रधानाच्या जनसेवेच्या विविध योजना या माध्यमातून गडचिरोली येथे भारतीय जनता पार्टी जिल्हा गडचिरोली चे वतीने परिक्षा पे चर्चा २०२३या संबंधित महत्वाची बैठक गडचिरोली चिमूर लोकसभा क्षेत्राचे खासदार अशोक जी नेते यांचे मार्गदर्शनाखाली संपन्न झाली.

 

शालेय विद्यार्थ्यांसाठी विविध शाळांमधील ९ वी ते १२ वी पर्यंतच्या शालेय विद्यार्थ्यांसाठी उपयुक्त कार्यक्रमाला कला क्रीडा शिक्षण सामाजिक क्षेत्रासारख्या कामातील विशेष व्यक्तींनी या स्पर्धेला सहभागी व्हावे.असे आव्हान या प्रसंगी खासदार अशोकजी नेते यांनी केले.

 

या प्रसंगी खासदार अशोकजी नेते,आमदार डॉ.देवराव होळी, जिल्हा संघटन महामंत्री रविंद्र ओल्लालवार,जिल्हा महामंत्री प्रमोदजी पिपरे,जिल्हा महामंत्री गोविंद जी सारडा,प्रदेश सदस्य स्वप्नील वरघंटे,युवा मोर्चाचे जिल्हाध्यक्ष चांगदेवजी फाये, नगरसेवक आशिष पिपरे,भारत बावनथडे युवा महामंत्री,मधुकर भांडेकर यु.महामंत्री,अनिल तिडके यु.महामंत्री,आशिष कोडापे जिल्हा संयोजक, मंगेश रणदिवे यु.महामंत्री, हर्षल गेडाम शहर महामंत्री,चंद्रशेखर गडसुलवार यु.महामंत्री,आनंद खजांजी सोशल मिडीया प्रमुख, रमेश अधिकारी मिडीया प्रमुख, उल्हास देशमुख, विकास पायडलवार,सारंग साळवे,तसेच अनेक कार्यकर्ते उपस्थित होते.

0Shares

By Dakhal News Bharat

भारत सरकारने फेब्रुवारी 2021 पासून अधिसूचित केलेल्या नव्या माहिती तंत्रज्ञान (IntermediaryGuidelines and Digital Media Ethics Code- Rules 2021) मध्यस्थ मार्गदर्शक सूचना आणि डिजिटल माध्यमांसाठीची आचार संहिता) नियम 2021 अंतर्गत सदर न्यूजपोर्टल Digital Media Publishers & News Portal Grievance Council of India” स्वनियमन संस्थेकडे (Rule १८नुसार) Reg. No- DMPNPGCI007 नोंदणीकृत आहे. डिजिटल माध्यमांसाठीच्या आचारसंहितेनुसार आम्ही पालन करतो. तरीही एखाद्या बातमीविषयी आपली तक्रार असल्यास भारत सरकारच्या कायद्यानुसार स्वनियमन संस्थेकडे विहित नमुन्यात अर्ज करू शकता. newsportalpublishergrievances@gmail.com