नागपूर विभागीय प्रतिनिधी-ऋग्वेद येवले

 

साकोली : साकोलीचे संत श्री लहरीबाबा मठ देवस्थानात दोन दिवसीय १०६ वा पुण्यतिथी सोहळा ( १६ जानेवारी ) ला गोपालकाला आणि महाप्रसादाने संपन्न झाला यात १५ हजारांहून अधिक भक्तांनी या महाप्रसादाचा लाभ घेतला. येथे सकाळी आमदार नाना पटोले, माजी पालकमंत्री परीणय फुके, माजी आमदार बाळा काशिवार, बीडीसीसी अध्यक्ष सुनील फुंडे यांनी दर्शनासाठी हजेरी लावली होती. 

     १५ व १६ जानेवारीला आयोजित या पुण्यतिथी महोत्सवात ह.भ.प. श्री घनश्याम वैरागडे महाराज मौदा नागपूर व ह.भ.प. श्री सुनील उरकुडे महाराज शिवणी मोगरा यांच्या मधुर व संगीतमय वाणीतून किर्तन भजन गोपालकाला करण्यात आला. घटस्थापना, समाधीपूजन, हरिपाठ, श्री लहरीलीला पोथी ग्रंथ पठन, काकड आरती, विडा असे विधीवत धार्मिक पुजन प्रसंगी शिवकृपा भजनी मंडळ, श्री बाल मनोहर भजनी मंडळ, दूर्गा भजनी मंडळ, नवदुर्गा भजनी मंडळ, विठ्ठल रखुमाई भजनी मंडळ, श्री गुरूकृपा भजनी मंडळ, दूर्गा महिला भजनी मंडळ, विठ्ठल प्रासदिक भजनी मंडळ, गायत्री परीवार भजनी मंडळ, जगदगुरू नरेंद्राचार्य महाराज भक्त सेवा मंडळ यांनी उत्कृष्ट संगीतमय किर्तनात भजनावली प्रस्तुत करून वातावरण भक्तीमय केले. कार्यक्रमात ह.भ

प. सुशिलाबाई नारायण लांजेवार उमरी यांचा श्री लहरी भूषण पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. गोपालकाला प्रसंगी महिलांची संख्या अधिक होती. सायं. ६ पासून ते रात्री १० पर्यंत पंधरा हजारांच्या वर भक्तांनी श्री संत लहरीबाबांचा महाप्रसाद ग्रहण केला. या दोन दिवसीय महोत्सवात अध्यक्ष प्रभाकर सपाटे, पदाधिकारी डॉ. हेमकृष्ण कापगते, पुंडलिक कवासे, तुळशीराम भुरे, ह.भ.प. डोमाजी कापगते महाराज, गंगासागर गुप्ता, नंदलाल उराडे महाराज, सुभाष धकाते, डॉ. केशव कापगते, पुस्तोडे गुरूजी, एच.लंजे, दूलिचंद कोसलकर, मुरलीधर गजापूरे, तिडके गुरूजी, किशोर भांडारकर, प्रदीप मासुरकर, अरूण गुप्ता, किशोर तिडके, बळीराम आगाशे, नितीन खेडीकर, भगवान पटले, जितेंद्र ठाकूर, अरूण चन्ने, गणेश देशमुख यांसह श्री रामभक्त हनुमान मंदिर तलाव वार्ड, श्री गणेश मंदिर गणेश वार्ड, गायत्री परीवार, सिंधी नवयुवक मंडल, श्री गजानन महाराज मंदीर देवस्थान पंचशिल वार्ड, साई मंदिर सिव्हिल वार्ड येथील पदाधिकारी आणि छायाचित्रे प्रसारण साकोली मिडीया, सर्व स्वयंसेवक, सेंदूरवाफा व साकोली शहरातील सर्व सामाजिक युवा कार्यकर्ते यांनी या भव्य महाप्रसाद वितरणासाठी अथक परिश्रम घेतले.

0Shares

By Dakhal News Bharat

भारत सरकारने फेब्रुवारी 2021 पासून अधिसूचित केलेल्या नव्या माहिती तंत्रज्ञान (IntermediaryGuidelines and Digital Media Ethics Code- Rules 2021) मध्यस्थ मार्गदर्शक सूचना आणि डिजिटल माध्यमांसाठीची आचार संहिता) नियम 2021 अंतर्गत सदर न्यूजपोर्टल Digital Media Publishers & News Portal Grievance Council of India” स्वनियमन संस्थेकडे (Rule १८नुसार) Reg. No- DMPNPGCI007 नोंदणीकृत आहे. डिजिटल माध्यमांसाठीच्या आचारसंहितेनुसार आम्ही पालन करतो. तरीही एखाद्या बातमीविषयी आपली तक्रार असल्यास भारत सरकारच्या कायद्यानुसार स्वनियमन संस्थेकडे विहित नमुन्यात अर्ज करू शकता. newsportalpublishergrievances@gmail.com