जिल्हा प्रतिनिधी
गडचिरोली
मौजा अडपल्ली ता. गडचिरोली येथे आयोजित “चक्रव्यूह” या नाट्यप्रयोगाच्या उद्घाटन प्रसंगी बोलतांना महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटी महासचिव डॉ. नामदेव किरसान यांनी ग्रामीण भागातील व विशेष करून शेतकऱ्यांच्या मुलांना चांगलं शिक्षण मिळालं पाहिजे यासाठी दर्जेदार शाळांची गरज असतांना बीजेपी शासन मात्र कमी पटसंख्या असणाऱ्या शाळा बंद करण्याचा विचार करीत आहे . ही अत्यंत निंदनीय बाब आहे व ग्रामीण जनतेला शिक्षणापासून दूर ठेवण्याचा प्रकार आहे.
तसेच केंद्रातील भाजप सरकारची योजना सार्वजनिक ऊपरकमांचेच नव्हे तर शाळांचे ही खाजगीकरण करण्याची आहे. मध्यप्रदेश मध्ये दहा हजार शाळा पायलट तत्वावर खाजगीकरण करण्याचे ठरले असल्याचे वृत्त प्रसिद्ध झालेले आहे. जर शाळांचे खाजगीकरण झाले तर मोफत शिक्षण बंद होईल व फी भरून आपल्या मुलांना शिकवावं लागेल जे शेतकरी व शेतमजुरांना शक्य होणार नाही करिता शाळा बंद करण्याच्या व खाजगीकरणाच्या योजनेस आंदोलनाद्वारे विरोध करावा लागेल. किसान सन्मान योजनेअंतर्गत मर्यादित शेती असणाऱ्या शेतकऱ्यांच्या खात्यात रुपये दोन हजार प्रमाणे वर्षाला सहा हजार रुपये जमा केले जातत परंतु खताच्या किंमती दुप्पटीने वाढवून, कीटकनाशके व बियाण्यांच्या किंमतीत वाढ करून, डिझेलच्या महागाईमुळे ट्रॅक्टर द्वारे मशागतीचा खर्च वाढवून एकूण उत्पादन खर्चात वाढ झाली असतांना केंद्र सरकार फक्त सहा हजार रुपये शेतकऱ्यांच्या खात्यात टाकून, अतोनात महागाई वाढवून त्यांच्या खिशातून बारा हजार रुपये काढून घेण्याचं काम करीत आहे. तसेच वाढती महागाई, बेरोजगारी, सार्वजनिक उपक्रमांचे खाजगीकरण इत्यादी विरोधात जोपर्यंत जनता आंदोलन करत नाही तोपर्यंत सरकार असेच दडपशाहीचे धोरण सुरू ठेवणार, करिता जनतेने जागृत राहून अन्याया विरुद्ध लढा देणे आवश्यक असल्याचे सांगितले.
यावेळी उद्घाटन सोहळ्याचे अध्यक्ष जिल्हा काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष महेंद्र ब्राह्मणवाडे, महाराष्ट्र प्रदेश सचिव डॉ. नितीन कोडवते, अजा काँग्रेस जिल्हाध्यक्ष रजनीकांत मोटघरे, किसान काँग्रेस जिल्हाध्यक्ष वामनराव सावसाकडे, रोजगार सेल जिल्हाध्यक्ष दामदेवजी मंडलवार, गडचिरोली शहर काँग्रेस अध्यक्ष सतीश भाऊ विधाते, तालुका काँग्रेस अध्यक्ष वसंतजी राऊत, दिवाकरजी निसार, जितू पाटील मुनघाटे, जिल्हा काँग्रेस उपाध्यक्ष शंकरराव सलोटकर व गणमान्य मंडळी तसेच मोठ्या संख्येने प्रेक्षक हजर होते.