इंद्रप्रस्थ लॉन समोर असलेला रपटा देत आहे अपघाताला निमंत्रण… — बांधकाम विभागाने त्वरित लक्ष देण्याची मागणी…

युवराज डोंगरे /खल्लार 

          उपसंपादक

        दर्यापूर मुर्तीजापुर रोड लगत असलेल्या इंद्रप्रस्थ लॉन् समोर रस्ता बांधकाम विभागाच्या वतीने पाणी वाहण्यासाठी रपटा बांधण्यात आला.

           हा रपटा रोड पासून दोन ते तीन इंचावर असून वाहन चालकांना रपट्याची वरील बाजू दिसत नसल्याने वाहने वेगाने आदळतात. त्यामुळे तेथील परिसरात असलेल्या कार्यालयातील नागरिकांची तारांबळ उडते.

           त्यामुळे अपघात झाला की काय अशा नजरेने रस्त्याकडे बघितले जाते. तर अनेकदा छोटे-मोठे अपघात या ठिकाणी घडले सुध्दा गेले .सदर मार्ग अति रहदारीचा असून येथील मार्गावर इंद्रप्रस्थ मंगल कार्यालय, वैभव लॉन,सीकची शाळा व समोरच गणेशपुर फाटा असून,हे जास्त वर्दळीची ठिकाणे असून मोठा अपघात नाकारता येत नाही.

         तर त्या ठिकाणी बांधकाम विभागातील अभियंत्यांनी कर्तव्याचा भाग म्हणून त्या समस्येकडे बघितल्यास भविष्यातील अपघाताला नक्कीच आळा बसणार परंतु अनेक वेळा त्या रपट्या विषयी तक्रार संबंधित विभागांना दिली असल्याचे सांगण्यात येत आहे.

         तरी सुद्धा या ज्वलंत प्रश्नाकडे अद्यापही संबंधित विभागाचे लक्ष लागले नाही हे दुर्दैवचं.