शुभम गजभिये
विशेष प्रतिनिधी..
उमरखेड येथील नामांकित संस्कार पोदार लर्न स्कूलच्या वतीने सततच विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासा साधता यावा या करिता विविध उपक्रम राबविले जातात त्याचाच एक भाग म्हणून संस्कार पोदार प्रेप उमरखेडचे वतीने वार्षिक क्रीडा दिवस २०२४-२५”बी अ स्पोर्ट्स विथ पोदार प्रेप”चे आयोजन करण्यात आले.
संचालक अजय क्षिरसागर, कार्यक्रमाचे अध्यक्ष प्रिन्सिपल बी. व्ही. मुंजाळ, सरप्राईज गेस्ट खसावत (अभियंता सा. बां.उमरखेड), प्रशासकीय अधिकारी अतिश दिघेवार यांचे विद्यार्थ्यांच्या वतीने पुष्पगुच्छ देऊन स्वागत करण्यात आले.
शाळेतील जूनियर आणि सीनियर केजीतील विद्यार्थ्यांनी एक ताल एक सूर एकाच लय बद्धतेत अत्यंत शिस्तीमध्ये सादर केलेल्या मार्च पास ने क्रीडा महोत्सव २०२४-२५ ला सकाळी ठीक १० वाजता सुरुवात झाली. विद्यार्थ्यांचा सर्वांगीण विकासाचे ध्येय समोर ठेवून विद्यार्थ्यांनी स्वतःची कशी काळजी घ्यावी,नीट नेटके टापटीप कसे रहावे,त्याचप्रमाणे शालेय शैक्षणिक प्रगती सोबतच शारीरिक मानसिक विकास कसा साधता यावा या दृष्टीने विद्यार्थ्यांनी स्वतःच्या कपड्याची घडी घालने,डायनिंग टेबल सजावट करणे,आपले कपडे वाळवयाला टाळणे,बुटांची लेस बांधणे,फुटबॉल फिनिशिंग लाईनच्या पार करणे इत्यादी प्रकारचे खेळ शिकवून आज वरील खेळाचे सादरीकरण करण्यात आले.
त्याचप्रमाणे पालकांकरिता सुद्धा खेळाचे आयोजन केल्या गेले त्यामध्ये पालकांनी उत्साहीपणे सहभाग घेऊन खेळ खेळण्याचा आनंद लुटला.
शाळेतर्फे आपण सतत नवनवीन उपक्रम राबवीत असता आणि त्यात पालकांनाही सहभागी करून घेता त्यामुळे पालकांचा आनंद द्विगुणीत होतो अशा प्रकारचे आयोजन आपण नित्य करत राहावे असे प्रतिपादन सरप्राईज गेस्ट खसावत यांनी केले.
आज झालेल्या सर्व खेळ क्रीडा प्रकारात प्रत्येक विद्यार्थ्यांनी सहभाग घेऊन आपले कौशल्य सादर केले त्यांचा हा आनंद कायम टिकावावा आणि त्यातून प्रेरणा घेऊन विद्यार्थ्यांनी आपल्या आयुष्याची जडणघडण कशी करावी याबद्दल ची माहिती प्रिन्सिपल बी.व्ही.मुंजाळ यांनी दिली. खेळ क्रीडा प्रकारातील सहभाग घेणाऱ्या प्रत्येक विद्यार्थ्यांना शाळेचे संचालक अजय क्षिरसागर, सरप्राईज गेस्ट खसावत,प्रशासकीय अधिकारी अतिश दिघेवार यांचे हस्ते प्रशस्तीपत्र देऊन विद्यार्थ्यांना गौरविण्यात आले.
यावेळी विद्यार्थ्यांच्या व पालकांच्या चेहऱ्यावरून ओसंडून वाहणारा आनंद बघावयास मिळाला.
आभार प्रदर्शनाने वार्षिक क्रीडा महोत्सव २०२४-२५ ची सांगता झाली.कार्यक्रमाचे यशस्वी ते करिता संचालक मंडळाचे नियोजनाखाली शाळेचे प्रिन्सिपल,प्रशासकीय अधिकारी,सर्व शिक्षक शिक्षिका आणि शिक्षकेत्तर कर्मचाऱ्यांनी घेतलेल्या परिश्रमाबद्दल त्यांचे कौतुक करण्यात आले.