श्री.दत्तात्रय जयंती निमित्त डॉ.सतीष वारजूकरांची साठगावला भेट तथा मार्गदर्शन…

शुभम गजभिये 

विशेष प्रतिनिधी..

       चिमूर विधानसभा मतदारसंघातील तथा चिमूर तालुक्यातील श्री.दत्तात्रेय मंदिर (महानुभावीय ),साठगांव येथे डॉ.सतीष वारजूकर यांनी भेट देत श्री.दत्तात्रय चरणी मनःपूर्वक विनंम्रभाव सादर केला.

                सयुक्त विद्यमाने श्री.दत्तात्रेय प्रभु जयंती यात्रा महोत्सव सुरु असून दहीहांडी,गोपालकाला या कार्यक्रमा प्रसंगी राष्ट्रीय उपाध्यक्ष ओबीसी महासंघ महाराष्ट्र प्रदेश तथा समन्व्यक चिमूर विधानसभा डॉ.सतिशभाऊ वारजुकर यांनी उपस्थिती दर्शवली तथा गोपालकाला प्रसंगी उपस्थित जनसमुदायाला मार्गदर्शन केले. 

              याप्रसंगी प्रामुख्याने तालुका काँग्रेस कमिटी अध्यक्ष डॉ. विजयजी गावंडे,युवक काँग्रेस अध्यक्ष चिमूर विधानसभा रोशन ढोक,कृषी उत्पन्न बाजार समिती संचालक नंदु पाटील गावंडे,कृषी उत्पन्न बाजार समिती सभापती मंगेश धाडसे,कृषी उत्पन्न बाजार समिती उपसभापती रवींद्र पंधरे,कृषी उत्पन्न बाजार समिती संचालक राजू बानकर,श्री. मुधोव्यास बाबा वरोरा,व समस्त गावकरी उपस्थित होते.