सोमनाथ सुर्यवंशी मृत्युप्रकरणी दर्यापूर मध्ये विविध राजकीय पक्षाच्यावतीने तीव्र निदर्शने…

युवराज डोंगरे/खल्लार 

         उपसंपादक

        परभणी शहरातील डाॅ.बाबासाहेब आंबेडकर स्मारका जवळील संविधानप्रतीकृतीची विटंबना करण्यात आली होती. त्यानंतर परभणी शहरात दगडफेक, जाळफोळ करण्यात आली होती. यात सहभागी झाल्यामुळे सोमनाथ सुर्यवंशी या युवकाला पोलिसांनी अटक केली होती.

          शहरात दगडफेक, जाळफोळ केल्याप्रकरणी युवकाला अटक केली होती.

         मात्र न्यायालयीन कोठडीत असताना सोमनाथ सूर्यवंशी यांचा मृत्यू झाला त्यानंतर आज आंबेडकर अनुयायांनी महाराष्ट्र बंदची हाक दिली होती.

         त्यामुळे सोमनाथ सुर्यवंशी या युवकाच्या समर्थनात आज छत्रपती शिवाजी महाराज चौक येथे तीव्र स्वरूपात निदर्शने करून शहरातील बस स्टॅन्ड चौकात आंबेडकरी अनुयायी व सर्वं राजकीय पक्षाच्या वतीने तीव्र निदर्शने करीत परभणी पोलिसांच्या विरोधात जोरदार घोषणाबाजी करीत निषेध आंदोलन करण्यात आले आहे.

           आंदोलन करतेवेळी, रामेश्वर इंगळे, ऍड विद्यासागर वानखडे हरिदास खडे, अंकुश कावडकर, अनिल गवई, निलेश पारडे, शरद आठवले, दिपक बागडे, दादाराव इंगळे, दिपक गवई, दिलीप गवई, चंदू रायबोले, अजय वर,रवी वानखडे,संजय चव्हाण इत्यादीच्या वतीने तीव्र स्वरूपात निदर्शने करण्यात आले.