तालुक्यातील अनेक गावांत पट्टेदार वाघाची दहशत… — शेतशिवारात वाघ दिसतं असल्याने शेतीची कामे खोळंबली… — वनविभाग कुंभकर्णी झोपेत, शेतकऱ्यांचे अतोनात नुकसान…

शुभम गजभिये 

  विशेष प्रतिनिधी.. 

चिमूर :- तालुक्यातील नेरी ,सरडपार,म्हसली,वडसी,गोंदेडा शेतशिवारात पट्टेदार वाघांचे दर्शन होतं असल्याने शेतकरी, शेतमजूर वर्गात भितीचे वातावरण निर्माण झाले आहे.

 शेत शिवारात व नदीच्या परिसरात वाघाने बस्तान मांडल्याने नागरिकांसह शेतकऱ्यांमध्ये भीतीचे वातावरण पसरले आहे. चिमूर तालुक्यातील सरडपार ,नेरी ,पाढरवाणी,खाबाडा ,म्हसली,वडसी, गोंदेडा,खातोडा परिसरात असलेल्या शेत शिवारात पट्टेदार वाघांचे दर्शन होतं असल्याने शेतकऱ्यांचे कामे खोळंबली आहेत.

पाढिव जनावरांवर वाघांचा हल्ला होण्याच्या घटना घडत आहेत. तालुक्यातील अनेक गावांतील परीसरात अनेक शेतमजूराना वाघांचे दर्शन घडत आहे. वाघाच्या संचारामुळे तालुक्यात भीतीचे वातावरण निर्माण झाले असून शेतात कामे करण्याकरिता मजुरांसह शेतकरी घाबरत आहेत. सद्यस्थितीत अनेक शेतीची कामे आहेत.त्यातच वाघाचे दर्शन होत असल्याने शेतातील सर्व कामे खोळंबली आहेत.

 शेत शिवारात वाघाचे पगमार्क दिसून आले. वाघाची संख्या किती ?असा प्रश्न सद्या चर्चेत आहे.वनविभागाकडून वाघांचा बंदोबस्त करावा अशी मागणी शेतकऱ्यांकडून होतं आहे.