सोमनाथ सूर्यवंशीच्या मृत्यूची सी.आय.डी.मार्फत चौकशी करुन पोलिसांवर गुन्हा दाखल करण्याची पीपल्स रिपब्लिकन पार्टीची मागणी…

युवराज डोंगरे /खल्लार 

         उपसंपादक

         परभणी येथे पोलिसांच्या मारहाणीत मृत्यू पावलेल्या सोमनाथ सूर्यवंशी यांच्या मृत्यूची सीआयडी मार्फत चौकशी करून दोषी पोलिसांवर हत्या केल्याचा गुन्हा दाखल करून त्यांना सेवेतून बडतर्फ करण्यात यावे.

           या मागणी करता आज दिनांक 16 डिसेंबर सोमवार मुख्यमंत्री यांच्या नावाने अमरावती जिल्हाधिकारी यांच्यामार्फत पीपल्स रिपब्लिकन पार्टीच्या वतीने निवेदन सादर करण्यात आले.

           निवेदन देताना पक्षाचे प्रदेश कार्याध्यक्ष चरणदास इंगोले, जिल्हा प्रभारी चंद्रकांत गुल्हाने, जिल्हा संघटक लक्ष्मण वाघमारे,संपर्कप्रमुख बाळासाहेब इंगोले, महासचिव गंगाधर खडसे, भंते संघपाल,युवा अध्यक्ष सुनील इंगोले, युवा नेते एडवोकेट,अतुल इंगळे, मंगेश कलाने व इतर कार्यकर्ते उपस्थित होते.