बाळासाहेब सुतार
नीरा नरसिंहपुर प्रतिनिधी
नागपूर येथे झालेल्या अधिवेशनात नवीन मंत्रिमंडळाच्या शपथविधी मध्ये विद्यमान आमदार दत्तात्रय मामा भरणे यांना कॅबिनेट मंत्रीपदी शपथ दिल्यानंतर इंदापूर तालुक्यामध्ये एकच जल्लोष होऊन फटाक्यांच्या आवाजाने आनंदी आनंद जल्लोष झाला.
तसेच इंदापूर तालुक्यातील अजितदादा पवार गटाचे राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे कार्यकर्ते पिंपरी बुद्रुक, नरसिंहपुर, गिरवी, टणु, लुमेवाडी, येथील सर्व कार्यकर्त्यांच्या वतीने नवीन कॅबिनेट मंत्री दत्तात्रय भरणे यांचा नागपूर येथे जाऊन येतोच सन्मान केला.पुढील वाटचालीस त्यांना शुभेच्छाही देण्यात आल्या.
उपमुख्यमंत्री अजितदादा पवार गटातून इंदापूर तालुक्याचे विद्यमान आमदार दत्तात्रय भरणे यांना कॅबिनेट मंत्रीपदी नागपूर येथे शपथ घेऊन मंत्री पदाची सूत्रे हातात दिल्यानंतर इंदापूर तालुक्यातील कार्यकर्ते यांच्या वतीने पिंपरी बुद्रुक, येथील सहकार महर्षी साखर कारखान्याचे संचालक तथा माजी सरपंच श्रीकांत बोडके पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली, सरपंच संतोष सुतार, सोमनाथ बोडके, शहाजी बोडके, केशव बोडके, नबीलाल शेख, भागवत शेंडगे, तसेच टनु येथील सरपंच सोमनाथ मोहिते तालुका उपाध्यक्ष महावीर जगताप, तसेच गिरवी येथील विद्यमान सरपंच पांडुरंग डीसले, उपसरपंच दादासाहेब क्षिरसागर, व लुमेवाडी येथील विद्यमान सरपंच सुनील जगताप, सरपंच उस्मान शेख, तसेच नरसिंहपूर येथील विद्यमान सरपंच नितीन सरवदे, माजी सरपंच नरहरी काळे, माजी सरपंच जगदीश सुतार, माजी सरपंच आनंद काकडे, अरुण क्षीरसागर , सहित सर्व कार्यकर्त्यांनी नागपूर येथे जाऊन कॅबिनेट मंत्री दत्तात्रय मामा भरणे यांचा यतोचीच आसा फुलांचा गुच्छ देऊन सन्मान करण्यात आला. पुढील मंत्रिमंडळाच्या वाटचालीस शुभेच्छाही देण्यात आल्या.